आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

ज्येष्ठनागरिक मित्र मंडळास- रोटरी क्लब तळेगाव सिटी तर्फे -“शुद्ध वॉटर कुलर”– लोकार्पण सोहळा संपन्न !

वॉटर कुलर चे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल शितल शहा, यांनी केले.

Spread the love

ज्येष्ठनागरिक मित्र मंडळास- रोटरी क्लब तळेगाव सिटी तर्फे -“शुद्ध वॉटर कुलर”– लोकार्पण सोहळा संपन्न !To Jyeshta Nagarik Mitra Mandal – by Rotary Club Talegaon City – “Suddh Water Cooler” – Inauguration Ceremony Completed!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. २५ फेब्रुवारी.

ज्या समाजामध्ये आपण राहतो वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक दायित्व भावनेतून रो प्रदीप व त्यांचे बंधू मोरेश्वर मुंगसे यांनी आपले पिताश्री स्वर्गिय नारायणराव मुंगसे यांच्या स्मरणार्थ अत्यंत दलदल आधुनिक वॉटर कुलर ज्येष्ठ नागरिक संघाच्या दादा दादी पार्क येथे उपलब्ध करून दिला.वॉटर कुलर चे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल शितल शहा, यांनी केले.

रोटरीचे प्रांतपाल शितल शहा यांनी रोटरीक्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले इथून जाताना या क्लबच्या विविध उपक्रमातून मी एक कार्यक्षमतेची ऊर्जा घेऊन जात आहे तीच ऊर्जा मला माझ्या प्रांतपाल पदाच्या काळात मोठी संजीवनी ठरेल असे गौरवोद्गार काढले.

याप्रसंगी रोटरी सिटी चे दिलीप पारेख, विलास काळोखे,किरण ओसवाल,सुरेश शेंडे,शाहीन शेख,रेश्मा फडतरे,शरयू देवळे,संजय मेहता हे प्रमुख उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर यांनी रोटरीक्लबचे पदाधिकारी आणि उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले संस्थेला हे वॉटरकुलर उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

रोटरी सिटीचे अध्यक्ष दिपक फल्ले यांनी ज्येष्ठांच्या सेवेची संधी आम्हाला दिली हे आम्ही आमच भाग्य समजतो असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं! संघाचे उपाध्यक्ष डॉ शाळीग्राम भंडारी यांनी रोटरीने आयोजित केलेला हा उपक्रम पाहणाऱ्याला अगदी छोटा वाटत असला तरी तो संवेदनशील समाजाला संदेश देणारा निश्चितच ठरेल असे आपले मनोगत व्यक्त केले.

माजी नगराध्यक्षा मीराताई फल्ले आणि  विठ्ठल कांबळे या दोघांनीही या अत्यंत उपयुक्त अशा रोटरीच्या उपक्रमाबद्दल संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.रोटरीक्लब तळेगाव सिटी आणि ज्येष्ठ नागरिकसंघाच्या बहुसंख्य सभासद उपस्थितीने  समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल राव कदम यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन मुंगसे परिवार व रोटरी सिटीच्या सदस्यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!