आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे येथून २ लाख रुपये किमतीचे अफिम जप्त..

२५ वर्षीय युवकाला अटक...

Spread the love

तळेगाव दाभाडे येथून २ लाख रुपये किमतीचे अफिम जप्त; २५ वर्षीय युवकाला अटक..Opium worth Rs 2 lakh seized from Talegaon Dabhade; 25-year-old youth arrested..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, वार्ताहर, ५ मार्च.

तळेगाव दाभाडे येथून २ लाख रुपये किमतीचे अफिम जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. ४) दुपारी शिक्षक सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई केली. या कारवाईत २५ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

 

दिनेश रामेश्वर लाल जाट (वय २५, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला तळेगाव दाभाडे शहरातील शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा एकजण अफिम विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ५ हजार ६०० रुपयांचे ५१४ ग्रॅम अफिन, १४ हजारांचा मोबाईल फोन आणि ५५ हजारांची दुचाकी असा एकूण २ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

तर दिनेश याने अफिम त्याच्या गावाकडील साथीदार दीपक सुथार (रा. बडीसादरी, जि. चितोडगड, राजस्थान) यांच्याकडून आणला होता. हा अफिम दिनेश तळेगाव दाभाडे परिसरात विक्री करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!