आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्र

शिरगाव चे प्रविण गोपाळे( सरपंच) खून प्रकरणातील अजुन ३ आरोपींना अटक.

सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसणाऱ्या तिघांना शिरगाव पोलिसांनी मंगळवारी दि. ४ रोजी पहाटे अटक केली.

Spread the love

शिरगाव चे प्रविण गोपाळे( सरपंच) खून प्रकरणातील अजुन ३ आरोपींना अटक.3 more accused in Shirgaon Pravin Gopale (Sarpanch) murder case .

आवाजन्यूज मावळ प्रतिनिधी, ४ एप्रिल.

शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा शनिवारी दि. १  ९.१५ वा. सुमारास रात्री, प्रतिशिर्डी साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसणाऱ्या तिघांना शिरगाव पोलिसांनी मंगळवारी दि. ४ रोजी पहाटे अटक केली. यापूर्वी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण समोर आले नाही. सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय ३१), ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२, तिघे रा. शिरगाव, ता. मावळ ), महेश  भेगडे (वय ४१, रा.  तळेगाव दाभाडे), अशोक लक्ष्मण कांबळे ( वय ५३ रा. कांब्रे नामा, ता. मावळ), मनेश देवराम ओव्हाळ (वय ४२ रा. जांभूळ, ता. मावळ), अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय ३८, रा. डॅफोडील सोसायटी, सोमाटणे फाटा, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रवीण हे त्यांच्या दुचाकीवर (एमएच 14/ एफझेड 7080) प्रति शिर्डी साई मंदिराच्या समोर रस्त्याच्या बाजूला बसले होते. त्यावेळी रेकी करून तिघांनी  त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून केला. याबाबत सरपंच प्रवीण गोपाळे यांचे बंधू रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीत रवींद्र यांनी काही स्थानिक व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. २) चौघांना अटक केली. त्यांना गुरुवार (दि. ६ ) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. ४ ) पहाटे शिरगाव पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मुख्य तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना सोमवार (दि. १० ) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आत्ता पर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांचा खून केल्याचा संशय त्यांचे भाऊ फिर्यादी रवींद्र यांनी व्यक्त केला होता. मात्र अद्याप पोलीस तपासात नेमके कारण समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!