आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

एम. आय. टी. ज्यूनिअर काॅलेज, तळेगाव येथे तीन हजार विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वाटपासह चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

Spread the love

एम. आय. टी. ज्यूनिअर काॅलेज, तळेगाव येथे तीन हजार विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वाटपासह चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..M. i. T. Prize distribution ceremony of painting competition concluded with distribution of participation certificates to 3000 students at Junior College, Talegaon.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ एप्रिल.

पुणे जिल्हा परिषद पुणे (शिक्षण विभाग), पं. स. मावळ व मावळ तालुका मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने “परिक्षा पे चर्चा” पर्व सहावे या उपक्रमांतर्गत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना एम. आय. टी. ज्यूनिअर काॅलेज तळेगाव दाभाडे च्या प्रांगणात प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. मावळ तालुक्यातून एकून तीन हजार एकशे चाळीस विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पंचवीस विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा महादेव भालशंकर ( रामभाऊ परुळेकर विद्यालय, तळेगाव ), द्वितीय क्रमांक वेदांत महेश जगताप ( भोंडे हायस्कूल, लोणावळा ) तर तृतीय क्रमांक ऋतुजा रुपेश गोडसे ( अण्णासाहेब चोबे हायस्कूल, तळेगाव ) यांनी पटकावला. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र मावळ तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, पुणे मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, लाईफ लॅब च्या टीम प्रमुख अनुश्री घिसाड, प्राचार्य विनोद साळवे यांचे हस्ते वितरण करण्यात आले.

 

या वेळी रणजीत थोरवडे, आदित्य रामचंद्रन, मनोज ढोरे, प्राचार्य उद्धव होळकर, रेखा परदेशी, ललीता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक एस व्ही जाधव, एस एस तनपुरे, अरुंदती देशमाने व इतर सह कला शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन पं.स मावळ च्या साधनव्यक्ती सुचिता भोई व आरती कुंडले यांनी केले तर आभार शिवाजी जरग व बिलकिस अन्सारी यांनी मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!