आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) इ.१० वीचा व १२ वीचा १०० टक्के निकालाने महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा जल्लोष.

विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा यंदाच्यावर्षी देखील कायम ठेवली असून विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.

Spread the love

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) इ.१० वीचा व १२ वीचा १०० टक्के निकालाने महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा जल्लोष.Pratibha International School and Junior College (CBSE Board) etc. 10th and 12th 10th and 12th results in the college students’ jubilation.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १८ मे.

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) इयत्ता १० वी व १२ वी चा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा यंदाच्यावर्षी देखील कायम ठेवली असून विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.

विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस, उपप्राचार्या लिजा सोजू, समन्वयक कविता देशपांडे.शाळेतील इ.१०-वी अन्वी शिंदे९६.६० टक्के प्रथम क्रमांक, शर्वरी देशमुख ९५ टक्के द्वितीय क्रमांक, तनुश्री म्हस्के ९५ टक्के द्वितीय क्रमांक, रिषित मिस्त्री ९४.६० टक्के तृतीय क्रमांक, सुयश नाईक ९४.४० टक्के चतुर्थ क्रमांक प्रणव नेहेते ९४ टक्के पंचम क्रमांक, आर्ची सोनिगरा ९४ टक्के पंचम क्रमांक संपादन केला. तसेच; १०० विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के च्या वरती १९ विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहे. इ.१०वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक श्यामसुंदर कांगणे, भरत बिर्‍हाडे, अनु थॉम्पसन, पुनम शिरोरे, विशांत चंद्रन व सौम्या दास यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील इ.१२-वी अयुषी चौधरी ९६.८० टक्के प्रथम क्रमांक, मधुरा देशमुख ९४.८०टक्के द्वितीय क्रमांक, तनुश्री जगदाळे ९४.४० टक्के तृतीय क्रमांक, फबेहा अन्सारी ९३ टक्के चतुर्थ क्रमांक, अश्विन सांगोकर ९२.६० टक्के पंचम क्रमांक, मोहम्मद अझिम असिफ़ खान पठाण ९२.६० टक्के पंचम क्रमांक, आकांक्षा थोरात ९२.४० टक्के क्रमांक संपादन केला. शिक्षक राजेंद्र सोनार, अभिजित डोंगरे, राजेंद्र मामिडी, शिक्षिका जसलीन कौर, भाग्यश्री शिर्के व जीबी जॉर्ज यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

शाळेच्या व विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!