आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

डॉ चित्रा जैन यांची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि खाद्य प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी इंडो-कोरिया केंद्रातून दक्षिण कोरियाला येथे अभ्यास दौऱ्या साठी निवड I

त्या २० मे २०२३ रोजी दक्षिण कोरिया (सोल) येथे जाणार आहेत.

Spread the love

डॉ चित्रा जैन यांची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि खाद्य प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी इंडो-कोरिया केंद्रातून दक्षिण कोरियाला येथे अभ्यास दौऱ्या साठी निवड I
Selection of Dr. Chitra Jain for Study Tour to South Korea from Indo-Korea Center to Study Educational, Cultural and Food Systems I

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी १८ मे.

कोरियन शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी डॉ चित्रा यांची दक्षिण कोरिया (सोल) येथे अभ्यास दौऱ्या साठी निवड करण्यात आली आहे I त्या २० मे २०२३ रोजी दक्षिण कोरिया (सोल) येथे जाणार आहेत.

डॉ चित्रा या एक सामाजिक कार्यकर्ती, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग, होलिस्टिक केअर, आणि स्विच वर्ड तज्ञ आहेत. त्या BNYS (निसर्गोपचार आणि योग) PGDBA, न्युट्रीशिअन अणि डायटेशिअन (स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका) च्या विध्यार्थी आहे I त्या बिस्वास डिजिटल मॅगझिन मध्ये संपादक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ज्युरी म्हणून काम पाहत आहे I त्यांनी रविशंकर,  नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस,  सुप्रियाताई सुळे,  चंद्रकांतदादा पाटील आणि इतर अनेक अशा प्रसिद्ध व्यक्तींना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ तर्फे पुरस्कार दिलेले आहेत.

  1. डॉक्टर चित्रा पुणे आणि अहमदनगर येथील नाकोडा उद्योग समूह चे संचालक जितेंद्र लोढा यांची पत्नी आहे I त्यांनी कोविड महामारी चालू असताना बराचसा वेळ प्रत्यक्ष कोविड सेन्टर मध्ये रुग्ण सेवेसाठी दिलेला आहे आणि अनेक कोविड रूग्णांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा अभ्यास करून त्यांना निसर्गोपचार, योग आणि आहार व इतर नैसर्गिक उपायांनी रूग्णांना बरे करून कोविड महामारीच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या सर्व कार्याबद्दल त्यांना महामारीच्या काळात ऑनररी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डायटेशिअन (AUGP-USA) , सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स (अमेरिकन युनिव्हर्सिटी, USA) तर्फे देण्यात आले, कोविड एक्सलन्स अवॉर्ड (SFIFA) “ कॅरोना वोरीयर” आणि फर्स्ट क्लास कोविड प्रॅक्टिशनर असे अनेक पुरस्कार मिळाले आहे I डॉक्टर चित्रा यांचे नाव वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन, गोल्ड एडिशन २०२२ आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ष २०२२ मध्ये नोंदवले गेले आहे I त्या मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती, मारवाडी या भाषाचे ज्ञान आहे, आणि आता त्या कोरियन भाषेचा अभ्यास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!