आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर डंपर पलटी झाल्याने एकाचा जागीच चिरडून मृत्यू

Spread the love

तळेगाव : मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खडीने भरलेला डंपर पलटी होऊन त्या खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत नॅशनल हेवी कंपनी समोर, गणेश खिंड येथे घडली.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर एमएच 14 जीडी 7837 या  क्रमांकाचा डंपर पलटी झाल्याने रस्ता क्रॉस करणाऱ्या सिद्धार्थ इराणा मच्ची याचा जागीच मृत्यू झाला.तर डंपर चालकही जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त डंपर बाजूला काढण्यात आला असला तरी मोठ्या प्रमाणात खडी महामार्गावर पसरली आहे. नॅशनल हेवी कंपनी समोर असलेला रस्ता अपघातांचे कारण ठरत असल्याने तो बंद करण्याची मागणी अनेक सेवाभावी संस्था व नागरिकांकडून केली जात होती. या ठिकाणी मोठे सिमेंट ब्लॉक लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु सिमेंट ब्लॉकमध्ये असलेल्या अंतरातून दुचाकीस्वार व पादचारी धोकादायकरित्या रस्ता क्रॉस करतात. त्यामुळे अपघातांना आमंत्रण दिले जाते. या अपघातानंतर हा रस्ता पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आयआरबी कंपनीकडून याची किती गांभीर्याने दखल घेतली जाते, की अजून बळी जाण्याची वाट पाहिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

https://youtu.be/0USPDQcvnAk

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!