क्रीडा व मनोरंजनसामाजिक

सरस्वती विद्यामंदिर ला विविध स्पर्धेमध्ये सुयश..

तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 'स्वच्छ सुंदर तळेगाव' व 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक.मिळाले

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर ला विविध स्पर्धेमध्ये सुयश..Saraswati Vidyamandir is successful in various competitions..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, ५ जुलै.

सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सुंदर तळेगाव’ व ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेले आहे. इनोव्हेशन स्पर्धेत इयत्ता आठवी एक मधील प्रणिता कोशे हिचा द्वितीय नंबर आला असून थ्री आर प्रिन्सिपल मध्ये शाळेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

इयत्ता नववी एक मधील रुजूला जगदाळे, श्रद्धा इंगळे ,रिद्धी ठाकूर ,श्रावणी जगताप, श्रुती थोरात, वैष्णवी पैठणे या विद्यार्थिनीने तयार केलेल्या लघु चित्रपटास दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे त्याचप्रमाणे इयत्ता सातवीतील संस्कार धावणे यास एमटीएस ऑलिंपिक परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळालेले आहे व ओंकार राठोड आणि ओंकार भोईटे या विद्यार्थ्यांनी देखील सुयश मिळवले आहे.

शिक्षिका  कल्याणी जोशी, सविता केंगले, छाया सांगळे, संजय गायकवाड, अरुंधती देशमाने व मुख्याध्यापिका  रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले होते. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, सदस्य. विश्वास देशपांडे, खजिनदार सुचित्राताई चौधरी ,कार्यवाह. प्रमोद देशक अंमलबजावणी अधिकारी. अनंत भोपळे ,सदस्य सुनील आगळे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!