राजकीय

पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करू – आमदार मानसिंगराव नाईक

Spread the love

सांगली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा आढावा बैठक संपन्न .

सांगली दि. ६ जून – प्रतिनिधी
येणार्‍या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाचे संघटन मजबूत झाले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. ते आज सांगलीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करुन पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे. लोकसहभाग वाढवून संघटन मजबूत केले गेले पाहिजे असेही आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले.जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील  यांनी दिनांक १० जून रोजीच्या वर्धापन दिनाच्या प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच ज्येष्ठ, युवक, महिला, युवती, विद्यार्थी विभागांचा संघटनात्मक आढावा घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासो मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शरद लाड, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, बाळासाहेब होनमोरे, आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा व प्रदेश पदाधिकारी आदी उपस्थित होते.

तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांना वाढदिवसाच्या जिल्हा कार्यकारिणीकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

१० जून रोजी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर पक्षाचा झेंडा व स्टीकर लावण्याचा संकल्प प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. त्याचे पालन जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!