आरोग्य व शिक्षणमावळ

कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

रोटरी क्लबचे विविध उपक्रमांचे आयोजन! रोटरीक्लब पुणे (कात्रज) यांनी कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये मध्ये १५ व १६ जुलै २०२३रोजी विविध उपक्रमातून विध्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.

Spread the love

कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.Guiding students through various activities in Krishnarao Bhegde School.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ जुलै.

रोटरी क्लबचे विविध उपक्रमांचे आयोजन! रोटरीक्लब पुणे (कात्रज) यांनी कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये मध्ये १५ व १६ जुलै २०२३रोजी विविध उपक्रमातून विध्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात १५ जुलै रोजी उद्घाटन समारंभाने झाली. प्रमुख पाहुणे जिल्हा युवा संचालक. विष्णू सर यांनी सत्राचे उद्घाटन केले.  सारंग माताडे यांनी ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स’ यावर मार्गदर्शन केले. जिल्हा युवा समुपदेशक दिवाकरन पिल्लई यांनी ‘ नेतृत्व वाढ’ आणि ‘संघ बांधणी’ या विषयावर उपक्रम राबविला.

शेवटचे सत्र भावनिक बुद्धिमत्तेवर होते. त्यावर मार्गदर्शन स्मिता विखणकर यांनी केले. दुसऱ्या दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने झाली. हे सत्र कल्याणी मुंगी यांनी घेतले. त्यानंतर  सारंग माताडे द्वारे ‘भाषण सत्र’ आयोजित केले गेले. अनिल होले द्वारे ‘रिलेशनशिप बिल्डिंगवर’ ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या शेवटी, प्रमुख पाहुणे जिल्हा युवा (RYLA) सह अध्यक्ष. भालचंद्र लेले यांच्या हस्ते सर्व २५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आरवायएलएचे अध्यक्ष मिलिंद आणि मुग्धा कुलकर्णी, सचिव अस्मिता पाटील, आरटीएन उदय थत्ते, प्रसाद गडकरी, उदय थत्ते, युवा संचालक कलेश नेरुरकर, आरटीआर अन्विता नेरुरकर, आरटीआर अक्ष कुलकर्णी आणि अश्वथ नेरुरकर उपस्थित होते. इयत्ता ८वी ते १०वीचे सर्व विध्यार्थी व शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे, खजिनदार. अनिल ताणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!