आपला जिल्हाराजकीय

शहरातील रुग्णांच्या हक्कासाठी ” तुमच्या समस्या आता आमच्या समस्या”. माधव पाटील, पदवीधर शहर अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस.

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये अनेक अडचणी आहेत पण त्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना शहरातील नेत्यांचे.

Spread the love

शहरातील रुग्णांच्या हक्कासाठी ” तुमच्या समस्या आता आमच्या समस्या”..माधव पाटील. पदवीधर शहर अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस.”Your problems are now our problems” for the rights of patients in the city..Madhav Patil. Graduate City President. Nationalist Congress.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी, २२ जुलै.   

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये अनेक अडचणी आहेत पण त्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना शहरातील नेत्यांचे.आता सामान्य माणसांसाठी सामान्य कार्यकर्त्यानेच रस्त्यावर उतरले पाहिजे म्हणून तुमच्या समस्या आता आमच्या समस्या हा उपक्रम राष्ट्रवादी पक्षाचे पदवीधर शहर अध्यक्ष माधव पाटील यांच्या वतीने घेण्यात आला.

रुग्णालयातील औषध तुटवडा अजूनही संपला नाही.अनेक रुग्णांचे नातेवाईक खाजगी मेडिकल मधून औषध आणत असतात.काही रुग्णांचे नातेवाईक वैतागून म्हणाले की हे सरकारी हॉस्पिटल आहे का खाजगी.” तुमच्या समस्या आता आमच्या समस्या ” या लोकोपयोगी उपक्रमाअंतर्गत आज लोकांच्या आणि रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
या समस्यांचे निवेदन वाय.सी. एम. चे अधिष्ठाता डॉ. वाबळे यांना दिले. यावर नक्की उपाययोजना करू असे डॉ. वाबळे म्हणाले. तसेच यावेळी रुग्णालयातील साफसफाई करणाऱ्या ‘मावशी आणि मामांचा’ सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते संघटक अरुण बोऱ्हाडे,मा. नगरसेवक जनाबाई जाधव, ज्योती निंबाळकर,व्यापारी सेलचे अध्यक्ष विजय
पिरंगुटे,वाहतूक संघटनेचे अध्यक्ष. काशिनाथ जगताप,कामगार नेते काशिनाथ नखाते,महिला बचत गटाच्या अध्यक्षा शिला भोंडवे ,राजन नायर,देवेंद्र तायडे,संपत पाचुंदकर,अरुण पवार,अनिल भोसले,पोपट पडवळ,संदीप चव्हाण,संतोष माळी,सचिन निंबाळकर,ज्योती जाधव, स्वप्नाली असोले,उज्वला वारिंगे,सुप्रिया कवडे,दमयंती आहेर,किशोर पवार, रवींद्र सोनावणे,राजू खंडागळे, राजेश हरगुडे,अक्षय फुगे,विवेक विधाते,निलेश पुजारी,राहुल धनवे,विकी पवार,बापू सोनावणे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!