मावळराजकीय

“सशक्त भारत समृद्ध भारत सेवा” सप्ताह सुरु.

वडगाव शहर भाजपच्या वतीने वसतिगृहातील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व पोषण आहाराचे वाटप.

Spread the love

सशक्त भारत समृद्ध भारत सेवा” सप्ताह सुरु; वडगाव शहर भाजपच्या वतीने वसतिगृहातील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व पोषण आहाराचे वाटप.”Stronger India Prosperous India Seva” week launched; Distribution of school materials and nutritional food to the students in the hostel on behalf of Vadgaon city BJP.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ जुलै.

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून राज्याचे उपमुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, कोणताही अनाठायी खर्च न करता,सेवा दिन, साजरा करत असतांना वडगाव मधील वनवासी वस्तीगृह (गोपाळराव देशपांडे )केशवनगर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, व पोषण आहाराचे वाटप, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील व मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.

विध्यार्थ्यांना प्रत्येकी, दोन वह्या, पेन्सिल, पेन सेट, सफरचंद, केळी, बिस्कीट असा सशक्त खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी मा सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे,भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विनायक भेगडे, युवा मोर्चा सरचिटणीस अतुल म्हाळसकर वडगाव शहर भाजपा प्रसिद्धी प्रमुख अमोल ठोंबरे,संजय रौंधळ, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!