मावळसामाजिक

स्त्रीशक्ती भाजी मंडई तर्फे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांचा सत्कार.

स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या वतीने रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली भाजी मार्केट कमिटी सदस्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती.

Spread the love

स्त्रीशक्ती भाजी मंडई तर्फे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांचा सत्कार.Senior leader Ramdas Kakade felicitated by Streeshakti Bhaji Mandai.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ जुलै.

तळेगाव स्टेशन येथील स्त्रीशक्ती भाजी मंडईच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांचा सत्कार करण्यात आला. स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या वतीने रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली भाजी मार्केट कमिटी सदस्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये रामदास काकडे यांनी भाजी विक्रेत्या बांधवांना मार्गदर्शन केले.

स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच त्यांचे कार्याला वंदन करून भाजी मार्केट कमिटीने सभेला शुभारंभ केला व दर महिन्यातील शेवटच्या शनिवारी अडीअडचणी सोडवण्यासाठी रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करणार असल्याचे नमूद केले.स्ञीशक्ती भाजी मंडई तळेगाव स्टेशन या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी मार्केटची भेट घेतली असता सर्व भाजी विक्रेते महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्केट विषयी होणाऱ्या अडचणी त्यांनी रामदास काकडे यांच्या समोर मांडल्या , त्या सर्व अडचणी जाणून घेऊन येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या अडचणी दूर करण्यात येतील असे रामदास काकडे यांनी यावेळी आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे निमित्ताने महिला स्त्री शक्ती भाजी मार्केट च्या अध्यक्षा तसेच तळेगाव स्टेशन काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीत दूबे, भाजी मार्केटच्या उपाध्यक्ष संगीता मराठे तसेच सर्व सदस्य त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे व सुनील पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!