आरोग्य व शिक्षणमावळ

कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या अन्यथा आंदोलन करू.जनसेवा विकास समिती.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत योग्य ते चौकशीचे आदेश द्यावेत असे निवेदन जनसेवा विकास समितीच्या वतीने मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले..

Spread the love

कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या अन्यथा आंदोलन करू.जनसेवा विकास समिती.Order an inquiry into the garbage contract or else we will protest.Jansewa Vikas Samiti.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, २६ जुलै.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत योग्य ते चौकशीचे आदेश द्यावेत असे निवेदन जनसेवा विकास समितीच्या वतीने मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तांत्रिक मान्यता न घेता बजावण्यात आलेल्या बिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात फुगवटा असल्याचे आढळून आलेले आहे. तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर बिलातील रकमेमध्ये बऱ्याच प्रमाणात घट झाली असल्याचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजले आहे. सुमारे दोन वर्ष नागरिकांच्या पैशाची लुटमार केलेल्या अधिकाऱ्यांवर चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्याची मागणी जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

जर चौकशीचे अंतरिम आदेश योग्य वेळेत दिले नाहीत तर जनसेवा विकास समितीच्या वतीने ९ ऑगस्ट २०२३, या दिवशी क्रांती दिनाचे औचित्य साधून ठीय्या आंदोलन करण्यात येणार आहे, त्याबाबतचे पत्र जनसेवा विकास समितीचे नगरसेवक रोहित लांघे, व सरचिटणीस निलेश पारगे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांना दिले आहे.

नागरिकांच्या पैशाची होणारी लूट ही बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे झालेली, असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे नगरसेवक रोहित लांघे यांनी नमूद केले आहे.मोठ्या बिलामध्ये तफावत आढळल्यामुळे सदर प्रकरण गंभीर असल्याचे निदर्शनास येत आहे मोठ्या प्रकल्पातील कामांना तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यकच आहे तांत्रिक मंजुरी नसल्यामुळे सदर प्रकरणी भ्रष्टाचार झालेला असल्याचा दावा जनसेवा विकास समितीचे सरचिटणीस निलेश पारगे यांनी केला आहे.

आंदोलना बाबतचे पत्र प्राप्त झाले असून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लवकरच घेऊ असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी केले आहे.यावेळी जनसेवा विकास समिती कार्याध्यक्ष कल्पेश भगत, समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, नगरसेवक रोहित लांघे , नगरसेवक सुनील कारंडे संघटक योगेश पारगे ,समीर दाभाडे, चंदन कारके, दीपक कारके, निलेश पारगे, दत्ता पारगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!