कृषीवार्ताग्रामीणमावळ

औंढेखुर्द , औंढोली , देवले , पाटण , बोरज, भाजे , दुधिवरे या गावात भातलागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग..

Spread the love

औंढेखुर्द , औंढोली , देवले , पाटण , बोरज, भाजे , दुधिवरे या गावात भातलागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग..In the villages of Aundhekhurd, Aundholi, Deole, Patan, Boraj, Bhaje, Dudhivere, farmers flock to harvest paddy.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी २६ जुलै.

औंढेखुर्द , औंढोली , देवले , पाटण , बोरज, भाजे , दुधिवरे या गावात भातलागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.सुमारे पंधरा ते वीस दिवस लांबलेल्या पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे या वर्षी आषाढी वारीचे वेळी आवणीला निघणारे शेतकरी यावर्षी भातरोपांची उगवण उशिरा झाल्यामुळे अधिक महिन्यात श्रावणात आवणीची कामे करताना दिसत आहेत.

कातकरी , तसेच मजूर यांची कमतरता भासत असताना एकमेकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने यंदा  भातरोपांची खणणी व लावणी करताना औंढोलीत  शेतकरी महिला व पुरुष दिसत आहेत.डोक्यावर इरले , व कामद असे पावसापासून संरक्षणासाठी घेणाऱ्या मजुरांनी व शेतकरी बंधू, भगिणींनी इरली आता कमी झाल्याने कोट व कागदाचा आधार घेतलेला दिसत आहे.

औंढेखुर्द, देवले, औंढोली, येथे इंद्रायणी भाताची लागवड सर्वच शेतकरी करतात.पूर्वी शेतकरी बासमती, कोलम, व विविध प्रकारची  बियाणे वापरत असत, परंतु ते उंच भात होत असल्याने भातकाढणीच्या पूर्वीच पडत असल्याने, उतारा कमी पडत असल्याने, सध्या इंद्रायणी भात बियाणे लावली जात आहेत. उत्पन्न वाढत असल्याने सर्वच शेतकरी इंद्रायणी ची लागवड करताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!