महाराष्ट्र

पत्रकार समाजाचे व प्रशासनाचे प्रतिबिंब – पो.नि. संदीप कोळी यांचे प्रतिपादन

Spread the love

नाशिक : न्याय,स्वातंत्र,समता व बंधुतेवर असणारी संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार संबोधला जात असून समाज आणि प्रशासन यांच्या मधील दुवा पत्रकार आहे. समाजाचे व प्रशासनाचे प्रतिबिंब उमटण्याचे काम करीत असतात.चांगल्या कामाची प्रशंसा तसेच झालेल्या चुकांची दिशादर्शिका मांडून निकोप लोकशाही मूल्य जोपासून वृध्दीगंत करणारी व्यवस्था अबाधित राखण्याचे महत्वाचे कार्य पत्रकार अविरत करीत असतात, असे प्रतिपादन येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले .

.येवला शहरातील हिंदुस्तानी मज्जित जवळील, समदिया फंक्शन हॉल मध्ये पोलीस टाइम्स न्यूजच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोरणायोद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस टाइम्स न्यूजचे मुख्य संपादक काझी सलिम तसेच येवला नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदुरकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळी ,संपादक शांताराम दुनबळे, उपसंपादक अफजल देवळेकर (सरकार ) नवी मुंबई नगरसेवक निसारभाई शेख निंबुवाले ,अहमदभाई शेख, हाजी आलमगीर शेख , ज्येष्ठ पत्रकार आयुबभाई शाह , ब्रह्मकुमारी नीतादीदी उपस्थित होते.

प्रास्ताविक पर बोलताना काझी सलिम म्हणाले, कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये स्वतः चा जिव धोक्यात घालून कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अनेक प्रशासकीय अधिकार्यांनी नागरिकांची सेवा केली. या काळात उल्लेखनीय कामगिरी करणार्यां अधिकारी यांचा सन्मान झाला पाहिजे तसेच पत्रकारांना विमा संरक्षण मिळणे गरजेचे असून कोरोना काळात मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी. शासनाने पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर्स दर्जा द्यावा. वर्षभर पत्रकार प्रसिद्धी देण्याचे काम करतात असे करताना त्यांना निरपेक्ष भूमिका ठेवावी लागते. प्रसिध्दीची अपेक्षा राखणारांनी पत्रकाराचाही तितकाच सन्मान राखला पाहिजे.समाजाचे हित जोपासून अन्यायाला वाचा फोडून जीव धोक्यात घालून काम करत असतात.पुढे बोलताना कोळी म्हणाले, पत्रकार समाजहित डोळ्यासमोर ठेवून आपली लेखनी चालवित असतात. समाज आणि प्रशासनातील अधिकारी यांचा खरा मित्रअसतो.पत्रकारांबद्दल कोणीही आकसबुध्दी ठेवू नये प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया च्या माध्यमातून समाजातील घटना मांडण्याचे निपक्ष काम करत असतात.

यावेळी मुख्याधिकारी नांदुरकर ,ब्रम्हकुमारी नितादिदी ,जेष्ठ मार्गदर्शक अजिजभाई शेख ,शेरूभाई यांनीही मनोगत व्यक्त केले.

विविध जिल्ह्यातून  रहिम शेख ,राहुल वैराळ ,हेमंत घावटे ,मनोहर देसले ,सोमनाथ मानकर, महेश साळुंके ,अभय पाटील, दत्तात्रय दरेकर ,आफरोज अत्तार ,संतोष सातदिवे,अनिल पवार सुनिल दुनबळे सुनील सोनवणे शिवाजी गायकवाड सह तालुक्यातील पञकार उपस्थित होते

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुण्यनगरी चे पञकार सिध्दार्थ मेहेरखांब यांनी तर आभार पोलीस टाईम्स न्युज संपादक शातांरामभाऊ दुनबळे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!