क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवडसामाजिक

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२३.कै. मनीषा भोईर विरंगुळा केंद्र चिंचवड येथे स्पर्धेचे आयोजन.

स्पर्धेसाठी एकूण ३५५ स्पर्धक सहभागी..

Spread the love

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२३.कै. मनीषा भोईर विरंगुळा केंद्र चिंचवड येथे स्पर्धेचे आयोजन;स्पर्धेसाठी एकूण ३५५ स्पर्धक सहभागी..District Level Carrom Competition 2023. Competition organized at Manisha Bhoir Wirangula Center Chinchwad; Total 355 contestants participated for the competition..

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ३१ जुलै.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्र मंडळ यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२३ चे आयोजन २९ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ अखेर कै.मनीषा भोईर विरंगुळा केंद्र प्रेमलोक पार्क चिंचवड येथे करण्यात आले.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पिंपरी चिंचवड महापालिकाचे उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, पिंपरी चिंचवड शहर नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक आप्पा बागल, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, कॅरम असोसिएशनचे नंदू सोनावणे, सुदाम दाभाडे, अविनाश कदम आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच विलास सहस्त्रबुद्धे, संजय नाडकर्णी शुभम पटेल परिक्षणाचे काम पाहत आहेत. सदर स्पर्धा पुरुष गट, महिला गट, ज्येष्ठ नागरिक या तीन गटात होत असून प्रत्येक वयोगटांमध्ये एक आठ क्रमांकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण ३५५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे यांनी केले. तर प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी केले आणि क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस यांनी आभार व्यक्त करीत स्पर्धकांना सदिच्छा दिल्या.

सदर स्पर्धा संयोजकांसाठी लिपिक शिवल मारणे, शंतनू कांबळे, अनिल म्हसे, विशाल गायकवाड यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!