क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवडसामाजिक

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा निकाल जाहीर..

मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...

Spread the love

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा निकाल जाहीर ; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…District Level Carrom Competition Result Announced; Prize distribution ceremony concluded by dignitaries…

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २ ऑगष्ट.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्रमंडळ, इंदिरानगर, चिंचवड यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे दि. २९ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.    त्याचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक महिला गटात पुष्करणी भट्टड, प्रथम पारितोषिक पुरुष गटात सागर वाघमारे, प्रथम पारितोषिक जेष्ठ नागरीक गटात फय्याज शेख यांना मिळाले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपायुक्त मीनानाथ दंडवते, माजी नगरसेवक अजित गव्हाणे,भाऊसाहेब भोईर, आप्पा बागल, भारत देसला, नंदू सोनवणे, क्रीडाअधिकारी अनिता केदारी, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले होते.

सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व सर्व स्पर्धकांचे स्वागत करून व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

स्पर्धा प्रमुख जयश्री साळवे यांनी सुत्रसंचालन केले तर अरूण खडूस यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!