निधनवार्तामावळ

कुसगाववाडी येथील अविवाहीत तरूणाची घरातच गळफास घेवून आत्महत्या ..

Spread the love

कुसगाववाडी येथील अविवाहीत तरूणाची घरातच गळफास घेवून आत्महत्या ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर 
लोणावळा ता.८(प्रतिनिधी )

कुसगाववाडी येथील आविवाहीत तरूणाने घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळले.
तेजेस दत्ता केदारी (वय-२२,ध़दा -ड्रायव्हर , रा -कुसगाववाडी, ता-मावळ ) ,असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो टेम्पोचालक म्हणून काम करीत होता.

लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ता.४ रोजी सायंकाळी ४.४५मिनिटांपूर्वी ही घटना घडल्याचे घरातील लोकांना व शेजारच्या लोकांना समजले. त्यांनी तेजेस हा घराचे छताचे आँगलला साडीने गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळल्याने तातडीने परमार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.माञ तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचे डाॕक्टरांनी घोषित केले.

याबाबत डाॕ.आनंद नायगावकर , परमार हाॕस्पिटल ,लोणावळा यांनी खबर दिल्यावरून लोणावळा ग्ग्रामिणचे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यू आशी नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार जय पवार तपास करीत आहे.
कै.तेजेस केदारी याचे लग्न ठरले होते .साखरपुडाहि झालेला होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
कै.तेजेस यांचे आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!