अध्यात्मिकमावळ

श्री विठ्ठल मंदिर संस्थान सन १९४५ (२०२३) च्या श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी.अनिल बबनराव फाकटकर यांची बिनविरोध निवड

ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर..

Spread the love

श्री विठ्ठल मंदिर संस्थान च्या श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी.अनिल बबनराव फाकटकर यांची बिनविरोध निवड; ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर ,१० ऑगष्ट.

श्री विठ्ठल मंदिर संस्थान सन १९४५ (२०२३) च्या श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी.अनिल बबनराव फाकटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी बुधवार दिनांक ०९/०८/२०२३ रोजी.ज्ञानेश्वर (माऊली) महाराज दाभाडे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम विणा, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, जागर, विष्णुसहस्रनाम, तसेच श्रींची ग्रामप्रदक्षिणा इत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचे ठरविण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील ह्या ऐतिहासिक व वारकरी वैदिक परंपरा असणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात बाराही महिने काकडा, हरिपाठ, शेजारती, इत्यादी सांप्रदायिक कार्यक्रम दैनंदिन होत असतात यावर्षी अंदाजे ६० लाख रुपये खर्चून श्रींच्या चांदीच्या मखराचे काम होणार आहे यासाठी भाविकांनी चांदी दान करावी असे आवाहन करून सन २०२३ ची श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीची कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी यतीन शहा, सोपान लोणकर, मुरलीधर ढेकणे, किरण श्री. पळसुले देसाई, काशिनाथ निंबळे सर, संपत गराडे,सुभाष बेल्हेकर , निवृत्ती फाकटकर, छबुराव भेगडे, रोहिदास दाभाडे ,किरण गवारे आदी उपस्थितीत होते.

अध्यक्ष :- अनिल बबनराव फाकटकर, कार्याध्यक्ष :- भगवान मारुती भेगडे ,चिटणीस :- किरण रामदास गवारे, खजिनदार:- प्रशांत शामराव दाभाडे, प्रसिध्दी प्रमुख :- सोनबा गोपाळे ,भोजन प्रमुख :- अरविंद हांडे पाटील , सुरेश टकले , हरिदास वनारसे ,कमलताई शिंदें ,दिंडी व्यवस्था तसेच विणेकरी आदींची निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!