आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे अग्निशमन विभागाकडून वडगाव फाटा येथेधूर सदृश आग नियंत्रित..

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Spread the love

तळेगाव दाभाडे अग्निशमन विभागाकडून वडगाव फाटा येथेधूर सदृश आग नियंत्रित; तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

आवाज न्यूज : वडगाव प्रतिनिधी, १० ऑगष्ट.

बुधवार (दि. ९) ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता जांभुळ फाटा येथे ओढ्याच्या वळणावर प्लास्टिक कचरा अज्ञात व्यक्तीने पेटवल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला असुन दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना त्याचा त्रास होत असल्याने अपघात होत आहे. अशी माहिती स्थानिक पोलीस स्टेशन व नगर पंचायत येथील दिनेश ढोरे यांनी तळेगाव दाभाडे अग्निशमन विभागाचे अधिकारी फुले यांना मिळाली असता त्यांनी ताबडतोब अग्निशमन टिम ला तेथे पाठवले.

अग्निशमन विभागाने तातडीने प्लास्टिकला लावण्यात आलेली आग विझली. त्यामुळे धुराच्या त्रासाने मोठा अपघात होण्याचा धोका टळला.स्थानिक पोलीस खोपडे , गाडेकर यांच्या मदतीने तळेगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान यामुळे तेथील होणारे अपघात टळले.तातडीने दखल घेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक दिनेश ढोरे यांनी अग्निशमन विभागाचे आभार मानले.

आग विझवुन होणारा धुर नाहिसा केला गेला अग्निशमन दलाचे कर्मचारी बाळु ठाकर, रोहित पवार, निरंजन भेगडे इत्यादी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!