मावळसामाजिक

लोणावळा महावितरण कंपनीच्या मनमानीपणामुळे राञ काढावी लागली अंधारात.

मीटर मध्ये काही छेडछाड केली आहे का हे पाहण्यासाठी मीटर खोलला पण काहीच हाती लागले नाही.

Spread the love

लोणावळा महावितरण कंपनीच्या मनमानीपणामुळे राञ काढावी लागली अंधारात.Due to the arbitrariness of the Lonavala Mahavitaran Company, we had to draw the line in the dark.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १० ऑगष्ट.

लोणावळा महावितरण कंपनीच्या मनमानीपणाचा अनुभव अनेकांना येत असतो. असाच काहीसा प्रकार मंगळवारी लोणावळा कालेकर मळा येथील संदीप कालेकर या ग्राहकाला आला. नियमित वीज बिलाचा भरणा करत असताना देखील मंगळवारी सायंकाळी साडेचार – पाच वाजण्याच्या सुमारास वीज वितरणचे तीन कर्मचारी कालेकर यांच्या घरी आले. वीज वितरणचा फ्लाइंग स्काॅड असल्याचे सांगत मीटर चेक करायला सुरुवात केली. तुमचा मीटर स्लो चालतो आहे असे सांगत मीटर मध्ये काही छेडछाड केली आहे का हे पाहण्यासाठी मीटर खोलला पण काहीच हाती लागले नाही. त्यानंतर त्यांनी मीटर स्लो आहे असे सांगत मीटर काढून घेतला. यावेळी संदीप कालेकर यांनी सर आम्हाला पर्यायी मीटर लावून द्या रात्र अंधारात काढावी लागेल असे सांगितले. मात्र त्या सूचनेकडे कानाडोळा करत त्या कर्मचार्‍यांनी उद्या वीज वितरण कार्यालयात असे सांगत निघून गेले.

महावितरण कंपनीच्या या मनमानीपणामुळे संदीप कालेकर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागली. बुधवारी त्यांनी याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात व वीज वितरण च्या नांगरगाव येथील मुख्य कार्यालयात लेखी तक्रार केल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांच्या घरी बदली मीटर लावण्यात आला.

याविषयी बोलताना संदीप कालेकर म्हणाले, मी लाईटचे बील नियमित व वेळेवर भरत असतो. त्या दिवशी कोणतीही पुर्व कल्पना न देता अचानक फ्लाइंग स्काॅड आमच्या घरी आला. मीटर स्लो चालत असेल तर त्याला वीज वितरण कंपनीने बदलावा त्याला देखील आमचा विरोध नाही मात्र तो काढून नेताना आम्हाला पर्यायी लाईटची सोय उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही तसेच आलेले कर्मचारी यांची भाषा देखील सौदर्याची नव्हती. आम्ही काहीतरी गुन्हा केला आहे अशा शब्दात ते आमच्याशी बोलत होते. महावितरण कंपनीच्या या मनमानीपणामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला तसेच मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!