मावळसामाजिक

समाजाचे ऋण कायम जपत राहील. रामदास काकडे आदिवासी लोक मित्र पुरस्काराने सन्मानित.

मावळ मध्ये जमीन हक्क परिषद व अदीवासी भटका बहूजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ९ऑगस्ट जागतिक आदीवासी दिन साजरा करण्यात आला.

Spread the love

समाजाचे ऋण कायम जपत राहील. रामदास काकडे
आदिवासी लोक मित्र पुरस्काराने सन्मानित.The debt of the society will be maintained forever. Ramdas Kakade Honored with Adivasi Lok Mitra Award.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १० ऑगष्ट.

मावळ मध्ये जमीन हक्क परिषद व अदीवासी भटका बहूजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ९ऑगस्ट जागतिक आदीवासी दिन साजरा करण्यात आला.

या दिवसाचे औचित्य साधून समाजात निरापेक्ष तसेच सातत्याने काम करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार क्षेत्रातील निर्भिड शोधपत्रकार साप्ताहिक निर्भिड चे संपादक मा.कांतीलाल कडू सर ,तसेच तळेगाव नगरीचे उद्योजक मा.प्रा.रामदास अप्पा काकडे, रक्तदान क्षेत्रातील योगदानात्मक काम असणारे संजय गायखे , मावळ तहसिलदार विक्रम देशमुख , आंतरराष्ट्रीय उद्योजक व विचारवंत मा.प्रशांत चव्हाण सर,सांप्रदाय क्षेत्रातील क्षिरसागर महाराज इ.मान्यवरांस “आदीवासी लोकमित्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी दोन्ही संघटनाचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे, तालुकाध्यक्ष ह.भ.प दिनकर नाना शेटे , महासचिव चंद्रकात शिंदे, युवकाध्यक्ष जालिंदर गोंटे, महिलाध्यक्ष करूणाताई सरोदे,सुरेखा माडे, मिनाक्षी मोरे, मिनल ढगे , अशोक जाधव, पांडूरंग तुपे, राजू शिंदे , फरिदभाईशेख,राजू वरघडे तानाजी गोळे, कांताराम भवारी .चंद्रकात सातकर , प्रवक्ता मिलिंद अच्युत, कार्याध्यक्ष योगेश पारगे, युथअध्यक्ष समीर दाभाडे ,सुनील गुजर इ. शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ईर्शाळवाडीतील बांधवांना व प्रा.हरी नरके यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगिताने कार्यक्रम ची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!