आरोग्य व शिक्षणमावळ

दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड चे वाटप.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त केले कार्यक्रमाचे आयोजन..

Spread the love

दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड चे वाटप.Distribution of school ID-cards to students of Shree.Sant Dnyaneshwar Secondary School, Diwad.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ ऑगष्ट.

ओवळे गावातील श्री.म्हसोबा भक्त व शिवभक्त-अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड चे वाटप.

ओवळे , मावळ – ओवळे गावातील श्री.म्हसोबा भक्त व शिवभक्त-अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभानिमित्त दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड (ओळखपत्र ) चे वाटप करण्यात आले.यावेळी ओवळे गावचे युवा नेते – शिवभक्त-अजित भाऊ शिंदे ,पै.अक्षयभाऊ भालेराव तसेच श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातीचे मुख्याध्यापक जाधव सर, विद्यालयाचे शिक्षक-शिंदे सर,भांड मॅडम,गायकवाड मॅडम,जाधव मॅडम,तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक.शशिकांत जाधव सर यांनी श्री.म्हसोबा भक्त व शिवभक्त-अजित शिंदे मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी खुप शिकावे व मोठे व्हावे .आणि स्वतःसाठी जगता जगता ह्या समाजासाठी देखील जगावे, काहीतरी करावे. असे मार्गदर्शन यावेळी शिवभक्त अजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!