क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवडसामाजिक

श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदीर, देहु परिसरात आतंकवाद्यांचा शिरकाव ?

पोलिसांच्या ‘मॉक ड्रिल’मुळे काहीकाळ तनावाचे वातावरण.

Spread the love

श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदीर, देहु परिसरात आतंकवाद्यांचा शिरकाव ? पोलिसांच्या ‘मॉक ड्रिल’मुळे काहीकाळ तनावाचे वातावरण.Entry of terrorists in Sri Jagadguru Sant Tukaram Maharaj Mandir, Dehu area? Due to the ‘mock drill’ of the police, the atmosphere was tense for some time.

आवाज न्यूज : देहु प्रतिनिधी, १२ ऑगष्ट.

देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीर परिसरात आतंकवाद्यांचा शिरकाव? पोलिसांनी केलेल्या या ‘मॉक ड्रिल’मुळे काहीकाळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदीर परिसरात आतंकवाद्यांचा शिरकाव झाल्यास कशा पध्दतीने सामोरे जायचं? या कारवाईचे पोलिसांनी ‘मॉक ड्रिल’ केले. आतंकवाद्यांनी शिरकाव केल्यावर वारकरी, भाविकांची कशी सुखरूप सुटका करायची, तसेच आतंकवाद्यांच्या मुसक्या कशा आवळायच्या याचे पोलीसांनी प्रात्यक्षिक करत सराव केला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या ‘मॉक ड्रिल’मुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत देहुरोड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदीर परिसरात  सायंकाळी ५.३० ते ७ या कालावधीत आंतकवादी शिरकाव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) कारवाईचा सराव केला.
यावेळी परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, तळवडे वाहतुक विभागाचे अमरनाथ वाघमोडे, तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, शिरगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. राऊत, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचेसह ६ पोलीस स्टेशनचे १० सहा पोलीस निरीक्षक/पोलीस उप-निरीक्षक, ७० अंमलदार, पोलीस मुख्यालयाकडील २ आर.सी.पी पथक, १ क्युआरटी पथक, पुणे ग्रामीणचे बीडीडीएस पथक, ॲम्ब्युलन्स वैद्यकीय उपचार पथक, फायर ब्रिगेड वाहन यांनी सहभाग नोंदवला.

या मॉक ड्रिलमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदीरात आतंकवाद्यांनी शिरकाव केल्यानंतर करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक करण्यात आले. मंदिरात प्रत्यक्षात अतिरेकी घुसले आणि त्यांनी काही वारकरी व भाविकांना बंधक केले तर त्यांची सुखरुप सुटका करून अतिरेक्यांवर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याचा प्रत्यक्षात सराव करण्यात आला.

सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!