ग्रामीणमावळसामाजिक

निगडी ते पवना नगर पीएमपीएल बस सुरु करा..दिपाली भोकरे, माजी उपसरपंच कडधे.

ग्रामस्थांच्या वतीने याबाबत पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.

Spread the love

निगडी ते पवना नगर पीएमपीएल बस सुरु करा..दिपाली भोकरे, माजी उपसरपंच कडधे मावळ.Start Nigdi to Pavana Nagar PMPL Bus..Dipali Bhokare, Ex Upsarpanch Kadhe. 

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १३ ऑगष्ट..

निगडी ते पवनानगर  बससेवा सुरु करावी. या परिसरात ३५ –४० गावे असून तेथून तालुक्याच्या, बाजार पेठेच्या तसेच शाळा महाविद्यालयासाठी ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. बससेवा सुरु केल्यास या प्रवाशांना प्रवास करणे सोपे होईल, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. बससेवा चालू केल्यास मावळात व्यवसायाला चालना मिळेल.

कडधे गावच्या माजी उपसरपंच दिपाली भोकरे आणि राष्ट्रीय मच्छिमार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास भोकरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने याबाबत पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, पवना धरण परिसरातील ३५- ४० गावातील विद्यार्थी, खासगी नोकरदार, कामगार, दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सरकारी नोकरदार, मासे विक्रेते, अन्य व्यावसायिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने दररोज पिंपरी-चिंचवड शहर, वडगाव, कामशेत, तळेगाव येथे ये जा करतात.

पवना धरण परिसरातील गावांमधून प्रवासासाठी एसटी महामंडळाची एकच बस आहे. तिच्याही अनियमित फेऱ्या, बसची दुरावस्था यामुळे प्रवाशांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. विद्यार्थी वेळेवर शाळा महाविद्यालयात पोहोचू शकत नाहीत. कामगार उशिरा कामावर गेल्यास अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो. तसेच व्यावसायिकांचे देखील उशिरा जाण्यामुळे मोठे नुकसान होते.

त्यात भरीस भर म्हणजे या परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणारे मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना बसवून प्रवास केला जातो. त्यामुळे या भागात पीएमपीएल बस सुरु केल्यास विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक वर्गाला खूप मोठा फायदा होईल. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास त्याचा फायदा पीएमपीएल ला देखील होईल. त्यामुळे या मार्गावर बससेवा सुरु करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!