क्राईम न्युजपिंपरी चिंचवड

आता मुलांनी गुन्हा केला तर पालकांवर देखील होणार गुन्हा दाखल.

काय आहे नवीन धोरण ? जाणून घ्या..

Spread the love

आता मुलांनी गुन्हा केला तर पालकांवर देखील होणार गुन्हा दाखल. काय आहे नवीन धोरण ? जाणून घ्या…Now, if the children commit a crime, the parents will also be booked. What is the new policy? Find out…

आवाज न्यूज : भोसरी प्रतिनिधी, १३ ऑगष्ट.

आता १८ वर्षा पेक्षा खालील मुलांनी गुन्हा केला. तसेच त्या गुन्ह्यात पालकांनी मुलांची पाठराखण केल्यास थेट पालकांवर कारवाई होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांची गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी नवीन धोरण अवलंबिले आहे.

त्यामुळे पालकांनो आता तुम्ही जरा जास्त सावध राहा, कारण तुमचा पाल्य जर गुन्हेगारी क्षेत्रात असेल, तर आताच त्याला आवरा. नाहीतर पालकांवरच कारवाई होणार आहे. सध्या अल्पवयीन मुलाचा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्रात सहभाग पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी थेट पालकांवरच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी दोन टोळीच्या वादातून एका वरती वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच घटनेतील आरोपींनी जय गणेश साम्राज्य चौकातील अमृततुल्य चहाच्या दुकानात येऊन धुडगूस घातला होता. या सर्व प्रकरणानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात होते. या गुन्ह्यात एकूण अरोपी पैकी चार आरोपी हे विधी संघर्षित बालक होते. तसेच या गुन्ह्यामध्ये असणारे दोन विधी संघर्षित बालकांवर खुनाच्या गुन्ह्याची देखील नोद आहे.त्याच अनुषंगाने पोलिसांनी या दोन विधी संघर्षित बालकाच्या राहत्या घरी तपास केला असता, पुणे विधी संघर्ष बालकांच्या घरी दोन तलवारी, तीन कोयते, एक चॉपर तीक्ष्ण धारदार हत्यार मिळून आली आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसीचे पोलीस वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी विधी शंकर शेठ बालकांच्या पालकांवर देखील कारवाई केली आहे.

आपल्या अल्पवयीन मुलांनी घरात धारदार तीक्ष्ण हत्यार आणून ठेवली आहेत. याची माहिती असताना देखील पालक मुलांना आळा घालत नाही. त्यामुळे भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दोन विधी संघर्ष बालकांच्या पालकांवर देखील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!