क्राईम न्युजमावळ

खोट्या बनावट सातबाऱ्याच्या आधारे जागा विकून प्लॉटधारकांची कोट्यावधीची फसवणूक..

देहुगावातील सहा जणांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

Spread the love

खोट्या बनावट सातबाऱ्याच्या आधारे जागा विकून प्लॉटधारकांची कोट्यावधीची फसवणूक ; देहुगावातील सहा जणांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

आवाज न्यूज : देहुगाव प्रतिनिधी, २० ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे येथील जमिन सर्व्हे नंबर २९६/१/२/३ मधील ८७ आर पैकी ५ आर (५००० स्के फुट) जागेचे टायटल क्लिअर नसतानाही फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या हेतूने आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेऊन टायटल क्लिअर असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वासघात करून कर्ज नोंद नसलेला खोटा बनावट सातबारा जोडला. खरेदी खतातही कर्जबोजा नमुद न करता फिर्यादीकडुन प्लॉटच्या खरेदीपोटी ३७.५० लाख रूपये घेतले.

तसेच २५ प्लॉटधारकांकडून २ कोटी ९० लाख २७ हजार रूपये अशी एकूण (३,२७,७७,०००) तीन कोटी सत्ताविस लाख सत्यात्तर हजार रूपये घेवून सात-बारा दप्तरी फिर्यादीसह इतरांच्या नावाची नोंद न करून देता सर्वांचा विश्वासघात करीत सर्वांची फसवणुक केली आहे.तसेच फिर्यादी हे संविधानिक अधिकारान्वये कायदेशिर पाठपुरावा करीता असताना फिर्यादी व प्लॉटधारक तिघांना आरोपींनी घर पडू, जिवे मारू अशी धमकी दिलेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सन २०१८ ते दि ३०/०५/२०२३ या कालावधीत मौजे तळेगाव दाभाडे येथे घडला.

फिर्यादी केदार विश्वनाथ शेलार यांनी महीला आरोपी, मनिष रघुनाथ झेंडे, प्रविण रघुनाथ झेंडे, सुर्यकांत मच्छींद्रनाथ झेंडे, चेतन बापुराव झेंडे, विशाल झेंडे (सर्व रा. झेंडेमळा, देहुगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी ४५२/२०२३ भा.द.वि. कलम ४०६,४२०, ४६५,५०६, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि साळी पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!