ग्रामीणमावळसामाजिक

कामशेत ग्रामविकास अधिकाऱ्यांअभावी कामशेतमध्ये नागरिकांचा कामांचा खोळंबा .

ग्रामविकास अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Spread the love

ग्रामविकास अधिकाऱ्यांअभावी कामांचा खोळंबा ; ग्रामविकास अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.Work stalled due to lack of village development officers; Villagers are demanding that a village development officer should be appointed immediately.

आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, २२ ऑगष्ट.

कामशेत ग्रामविकास अधिकाऱ्यांअभावी कामशेतमध्ये नागरिकांचा कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे येथे ग्रामविकास अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नागरिकांना मारावे लागताहेत हेलपाटे गेली सहा महिने कामशेत ग्रामपंचायतीला ग्राम विकास अधिकारी प्राप्त झालेला नाही. ही जागा रिक्त आहे. पर्यायी ग्रामसेवक म्हणून साते गावचे ग्रामविकास अधिकारी सोनटक्के हे कार्यभार सांभाळत आहेत. परंतु, दोन्ही ग्रामपंचायती मोठ्या असल्यामुळे त्यांना कामशेत ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ देता येत नाही. दोन-तीन दिवस ते ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असतात. त्यामुळे नागरिकांना विनाकारण ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

अनेक कामे रखडली ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे “आठ अ “चा उतारा, रहिवासी दाखला, जन्म दाखला इत्यादी शासकीय कागदपत्रे लोकांना वेळेवर मिळत नाहीत. तसेच, ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे ग्रामपंचायतीतील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे कामशेत ग्रामपंचायत हे बिनकामाचे कार्यालय झाले आहे. तसेच, नागरिकांना अनेक गोष्टींची माहिती विचारायला अडचण निर्माण होत आहे.

तसेच, ग्रामपंचायत सदस्य व सरपंच-उपसरपंच यांच्यामधील दुवा असणारे ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे गावातील बरीचशी कामे रखडली आहेत. यासंबंधी ग्रामपंचायत कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी सीईओंना या संदर्भात पत्र दिले आहे. तरीही नियुक्ती न झाल्यामुळे अजून अधिकाऱ्याची प्रतीक्षा करायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!