ग्रामीणमावळ

पवन मावळात गोरक्षकांची कारवाई..

3 बैलांची कत्तली पासून सुटका..

Spread the love

पवन मावळात गोरक्षकांची कारवाई ; 3 बैलांची कत्तली पासून सुटका..Action of cow guards in Pawan Maval; 3 bulls saved from slaughter..

आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, २३ ऑगष्ट.

पवन मावळमध्ये गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करत तीन देशी बैलांना कत्तलीपासून जीवदान दिले आहे. ही घटना रविवारी २० ऑगस्ट रोजी घडली.

पवन मावळात लोणावळा कुंभेरी येथून (एम. एच. १४ डी. एम. ९११४), (एमएच १४ डीएम ९१०५), (एमएच १४ डीएम ६०००) अशी तीन खोट्या नंबर प्लेट लावून पिकअप गाडीमध्ये बैलांची वाहतूक करण्यात येत होती. एजंट सुनील राऊत हा शेतकऱ्यांकडून बैल विकत घेऊन ते कत्तल करण्यासाठी पाठवणार असल्याची माहिती पवनानगर येथील
गोरक्षकांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी प्रतीक भेगडे यांच्याशी संपर्क साधला होता.चारा-पाण्याची देखील नव्हती व्यवस्था पवनानगर येथील गोरक्षक प्रतीक भेगडे, ज्ञानेश्वर आंद्रे, विजय मांडुळे, प्रशांत ठाकर, सुधीर दहिभाते, प्रदीप मालुसरे, विश्वास दळवी, निलेश ठाकर, सूरज तोडकर, प्रसाद खराडे, ओंकार वरघडे, दत्ता ठाकर, सौरभ आंद्रे, अनिकेत आंद्रे, प्रशांत आंद्रे यांनी लोखंडीवाडी येथे सापळा रचला होता. पिकअप टेम्पो पवनानगरकडून कामशेच्या दिशेने येताना गोरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्या टेम्पोची तपासणी केली. त्यावेळी मागील बाजूस ताडपत्री काढून पाहिले असता तीन देशी बैल बांधलेले दिसले होते.कामशेत पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!