मावळसामाजिक

वडगाव मावळ येथे, जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे उद्घाटन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते संपन्न.

Spread the love

वडगाव मावळ येथे, जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे उद्घाटन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते संपन्न.At Vadgaon Maval, Jai Malhar Auto Rickshaw Association was inaugurated by MLA Sunil Shelke.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ ऑगष्ट.

नगरपंचायत स्थापन झाल्यापासून वडगाव शहर अधिक वेगाने विस्तारत आहे. वडगाव शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. अशी वाढती लोकसंख्या आणि नागरिकीकरण लक्षात घेता नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार, जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची होणारी अडचण लक्षात घेवून त्यांचा प्रवास अधिक सोपा व्हावा, या हेतूने वडगाव शहरातील खंडोबा चौक येथे  जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

सदर संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन मावळचे आमदार सुनिल शेळके ह्यांच्या हस्ते आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी वडगाव नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, माजी मंगेश खैरे, माजी नगरसेविका पुजा वहिले, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, तुषार वहिले, अफताब सय्यद, शैलेश वहिले, सौरभ सावले, संतोष देशमुख, आप्पा तुमकर आदी उपस्थित होते.

जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे संस्थापक माजी उपसरपंच विशाल वहिले हे असून अध्यक्ष योगेश भोकरे आहेत. विनायक लंके, संतोष धोंगडे, प्रदीप जोगदंड, ओंकार धोंगडे, किरण गावडे, अमोल पवार, कैलास फाटक, पांडुरंग कचरे हे सभासद आहे. नामफलकाच्या अनावरणानंतर उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनिल शेळके यांचा सन्मान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!