ताज्या घडामोडीदेश विदेश

ऐतिहासिक! चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान-3’चं यशस्वी लँडिंग; देशभरात जल्लोषाचं वातावरण..

Spread the love

ऐतिहासिक! चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान-3’चं यशस्वी लँडिंग; देशभरात जल्लोषाचं वातावरण.Historic! Successful landing of ‘Chandrayaan-3’ on the lunar surface; An atmosphere of jubilation across the country.

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, २३ ऑगष्ट.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केली आहे. यामुळे चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
चांद्रयान-3’ने पाठवला संदेश.

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चांद्रयान-3 ने एक संदेश पाठवला आहे. “मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे”; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

चांद्रयानाच्या यशानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून ‘चांद्रयान-3’च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहिलं. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी इस्रो, टीम चांंद्रयान आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या. या क्षणासाठी कित्येक वर्षे, कित्येक लोकांना अविरत मेहनत केली आहे. या सर्वांना मी शुभेच्छा देतो; असं पंतप्रधान म्हणाले.ऐतिहासिक क्षण!चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.रफ ब्रेकिंग फेज पूर्ण लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात येईल. हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा असणार आहे.

रफ ब्रेकिंग फेज, लँडिंग प्रक्रियेतील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेज असणार आहे. यामध्ये विक्रम लँडरचा वेग हा 1.68 किमी प्रति सेकंद यावरुन कमी करून 358 मीटर प्रति सेकंद एवढा करण्यात येईल. लँडरचा वेग कमी करण्यासाठी 400 न्यूटन क्षमतेचे चार इंजिन फायर करण्यात येतील. हा टप्पा 690 सेकंदात पार पडेल. यानंतर विक्रम लँडर हे चंद्रापासून अवघ्या 7.4 किलोमीटर उंचीवर असताना. या फेजला सुरुवात झाली होती.

पॉवर डिसेंटला सुरुवात! इस्रोच्या मिशन कंट्रोलने लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली आहे. यानंतर लँडर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेज असणार आहे.लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या पूर्ण लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडली असल्याचे इस्रोने व्यक्त केला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!