कृषीवार्तामहाराष्ट्र

मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ मनसे कडून देवळा तालुका दुष्काळ जाहीर करण्याची व निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी.

Spread the love

मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ मनसे कडून देवळा तालुका दुष्काळ जाहीर करण्याची व निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी.

आवाज न्यूज : नाशिक प्रतिनिधी, २४ ऑगष्ट.

देवळा ( चंद्रशेखर कापसे ) जिल्ह्यातील निष्क्रिय आमदार खासदार आणि केंद्र व राज्यातील शेतकरी विरोधी सरकारचा व धोरणाच निषेध व्यक्त करत देवळा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन देवळा तालुका दुष्काळी जाहीर करून केंद्र सरकारने कांदा पिकावर निर्यातीसाठी जी जुलमी 40% निर्यात शुल्क लागू करत शेतकरी विरोधी भूमिका घेऊन बळीराजाला उध्वस्त करण्याचे महापाप थांबवावे असे आशयाचे निवेदन शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष. हरिभाऊ चव्हाण व मनसे माझी तालुकाध्यक्ष विश्वास पवार यांच्या नेतृत्वाखाली देऊन निषेध नोंदविण्यात आला.

नाशिक जिल्हा हा कांदा पिकाचे आगार असून शेतकऱ्याला कांद्याशिवाय जगण्याचे दुसरे साधन नाही यावर्षी साठवलेला उन्हाळी कांदा गारपिटीने सडल्यामुळे शिवाय शेतकरी विरोधी धोरणामुळे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल अशा बेभावाने विकावा लागला आहे कुठेतरी आठवड्या पासून बळीराजाच्या पदरात 15 ते 20 रुपये प्रति किलोने भाव मिळू लागताच जुलमी मोदी सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क 40 टक्के करून जणू बळीराजाचे कंबरडे मोडण्याचा विडाच उचललेला आहे असे आरोप मनसे तालुकाध्यक्ष विश्वास पवार यांनी व्यक्त करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध नोंदविला आहे.

मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून शासनाने खरीप हंगामात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दुष्काळाने गिळंकृत केला असल्याने शेतकऱ्यांचे वीज बिल माफी करावे, खरीप हंगामातील बियाणे खर्च द्यावा, देवळा तालुक्यासह नाशिक जिल्हा दुष्काळी घोषित करून जनावरांना चारा पाणी उपलब्ध करून देत शेतीपंपांचे विद्युत बिल पूर्णपणे माफ करावे, ग्रामीण विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क, फी माफी व झालेला खर्च विद्यार्थ्यांना परत देऊन खास दुष्काळी शैक्षणिक धोरण जाहीर करावे.तसेच रामेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरून रामेश्वर ते झाडी एरंडगाव कालव्याला पाणी सोडून शेतकऱ्यांना व जनावरांना दिलासा द्यावा आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला प्रतिक्विंटल 4000 भाव जाहीर करावा असे आशयाचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले जिल्ह्याबरोबरच कसमादे पट्ट्यातील लोकप्रतिनिधी बरोबरच पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा यावेळी मनसेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तालुकाप्रमुख हरिभाऊ चव्हाण माजी तालुकाप्रमुख विश्वास पवार यासह मनसे सैनिक प्रवीण निकम ,सचिन शेवाळे, दिगंबर हिरे, संदीप गांगुर्डे, सतीश शेवाळे, देविदास बोरसे, संदीप शेवाळे, अमोल अहिरे, विनोद सोनवणे, जितू अहिरे आधी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!