निधनवार्तामावळ

कुंडमळा येथे दोन मुले नदीत पोहताना बुडाली..

एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु.

Spread the love

कुंडमळा येथे दोन मुले नदीत पोहताना बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु.Two children drowned while swimming in the river at Kundmala, one’s body is in the hands of the search team, the search for the other is on.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ ऑगष्ट.

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे दोन मुले वाहून गेल्याची दुर्घटना आज, गुरुवार (दिनांक 24 ऑगस्ट) रोजी घडली. सकाळी 9 नंतर कुंडमळा  शेलार मळा भागात पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चारपैकी दोन जण वाहून गेले तर दोन जण बचावले. मुले वाहून गेल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र आणि तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दिवसभर शोधकार्य केल्यानंतर संध्याकाळी 7 च्या सुमारास एका मुलाचे शव शोधण्यात शोध पथकाला यश मिळाले. पण दुसऱ्या मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही, त्याच्यासाठी उद्या पुन्हा एकदा शोधकार्य केले जाणार आहे. चिखली जाधववाडी येथील ही मुले कॉलेज बुडवून कुंडमळा येथे पर्यटन आणि जलविहाराचा आनंद घेण्यासाठी आली होती. चार पैकी दोन मुले वाचली, एक मुलगा अनिकेत वर्मा (वय 17) याचा मृतदेह शोधपथकाला सापडला आहे. तर, अशोक गुलाब चव्हाण (वय 17, चिंचवड – गेंडीभाई चोपडा हायस्कूल ज्युनियर कॉलेज) ह्याचा शोध लागला नसून उद्या त्याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सत्यवान माने यांनी दिली.

वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्र यांची टीम निलेश संपतराव गराडे, भास्कर माळी मामा, अनिल आंद्रे, गणेश ढोरे, गणेश निसाळ, विनय सावंत, गणेश गायकवाड, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, शुभम काकडे, निनाद काकडे, वैभव वाघ, सागर कुंभार, रतन सिंग, योगेश दळवी, सिध्देश निसाळ, महेश मसणे, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू, प्रशांत शेडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद निरंजन भेगडे, रियाज मुलानी, गणेश जावळेकर, शुभम काळोखे, धीरज शिंदे, अक्षय घोडेकर आणि तळेगाव दाभाडे पोलिस यांनी बचाव आणि शोधकार्यात सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!