कृषीवार्तामावळ

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महिंद्रा ॲसेलो कंपनी व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांचे संयुक्त विद्यमाने स्टेशन तळे परिसरात 500 देशी प्रजातीच्या झाडांची लागवड.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महिंद्रा ॲसेलो कंपनी व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांचे संयुक्त विद्यमाने स्टेशन तळे परिसरात  500 देशी प्रजातीच्या झाडांची लागवड.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५.

दि. 24 जून 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महिंद्रा ॲसेलो कंपनी व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांचे संयुक्त विद्यमाने स्टेशन तळे परिसरात जुना मुंबई-पुणे हायवे लगत 500 देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली.

लागवड केलेल्या वृक्षांमध्ये सिताअशोक, कदंब, आंबा, कडुलिंब, वड, पिंपळ इ. प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी एन.के.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात आले.

सदर वृक्षलागवड उपक्रमासाठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, जेष्ठ सिनेअभिनेत्री सविता मालपेकर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महिंद्रा ॲसेलो कंपनीचे मॅनेजर श्रीवास्तव व महिंद्रा कंपनीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष सुरेश शेंडे, दीपक फल्ले, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे यांनी उपक्रम नियोजन व वृक्षलागवडीसाठी विशेष सहकार्य दिले.

नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, मिळकत व्यवस्थापक जयंत मदने, महिला व बालकल्याण विभागप्रमुख सुवर्णा काळे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन उद्यान विभाग प्रमुख.सिद्धेश्वर महाजन व त्यांचे सहकारी रणजीत सूर्यवंशी, आकाश निंबळे व कर्मचारी यांचे मार्फत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!