महाराष्ट्र

माही फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Spread the love

कडधे : येथील माही फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेतील पन्नास विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

फाउंडेशनच्या वतीने कडधे गावातील मुलांसाठी विविध कोर्सेस चालविण्यात येतात. ग्रामीण भागातील मुले स्पर्धेत कुठेही मागे पडू नये यासाठी संगणक प्रशिक्षण, संभाषण कला, स्पोकन इंग्लिश, संस्कार वर्ग हे कोर्सेस संस्थेच्या वतीने मोफत घेण्यात येतात.

स्वातंत्र्यदिन उत्सवप्रसंगी राज देशमुख, सा. रा. बालाजी,कर्णल जयवंत काडे, देवेन सूर्यवंशी, विद्या बेनगुडे, आकाश गायकवाड, सुनील बेनगुडे,दिनेश धोंगडे,अंजली सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राज देशमुख यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सुतार व आभार प्रदर्शन सुनील बेनगुडे यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!