मावळराजकीय

शासकीय योजनेच्या मंजुरी पत्रांचे वाटप..

Spread the love

शासकीय योजनेच्या मंजुरी पत्रांचे वाटप..Distribution of government scheme approval letters..

आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, १ सप्टेंबर.

मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने शासकीय योजनांचे मंजुरी पत्रे वाटप नुकतेच करण्यात आले. या वेळी माजी अध्यक्ष गणेश काजळे यांच्या पुढाकारातून शासकीय लाभाच्या योजनेची मंजुरी पत्रे देण्यात आली. संजय गांधी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमपीएलच्या बस पाससाठी लागणारे ओळखपत्र, दिव्यांग पेन्शन मंजुरी अशा लाभार्थ्यांना पत्रक वाटप करण्यात आले. या वेळी मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे उपस्थित होते.

गणेश काजळे म्हणाले, की मावळ परिसरातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजनेसह विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांनी कामशेत येथील कार्यालयात देण्यात आली आहे. जेणेकरून योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!