मावळसामाजिक

सुसंस्कारित समाज निर्मितीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे: संतोष भेगडे.

ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयातील सभागृहात झालेल्या मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

Spread the love

सुसंस्कारित समाज निर्मितीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे: संतोष भेगडे.Contribution of teachers is important in building a cultured society: Santosh Bhegade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ४ सप्टेंबर.

सुसंस्कारित विद्यार्थी व आदर्शमय समाज निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करीत असल्याने त्यांचे समाजातील मानाचे स्थान अजूनही कायम टिकून आहे. आदर्श व सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शिक्षक हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन ; पीएमआरडीएचे सदस्य, माजी नगरसेवक तथा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे आधारस्थंभ
संतोष भेगडे यांनी केले.

ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयातील सभागृहात झालेल्या
मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत
ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण असवले होते. व्यासपीठावर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य संघटक तथा हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय बाविस्कर, पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, सल्लागार भाऊसाहेब अगळमे, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष भेगडे म्हणाले, देशाच्या प्रगतीमध्ये सहकाराची भूमिका खूप मोठी आहे. सहकार क्षेत्रामध्ये पारदर्शकतेला खूप महत्त्व असते.ही पारदर्शकता आणि परस्पर विश्वास मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ आणि सभासदांमध्ये आहे.संस्था म्हणजे काटेरी मुकुट डोक्यावर घेवुन काम करावे लागते. पतसंस्थेने सभासदांची आर्थिक पत वाढविण्याचे काम करावे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.मनोगत व्यक्त करताना संजय बाविस्कर म्हणाले,संतोष भेगडे व मी या शाळेचे माजी विद्यार्थी असून या सोहळ्यात गुरुजनांचा सत्कार करण्याचा योग आला, हे आमचे परमभाग्य आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आम्ही घडलो गेलो.सर्व शिक्षक शास्त्रज्ञच आहेत. पतसंस्थेच्या कार्याचा चढता आलेख हा अभिमानास्पद आहे. स्वतःच्या वास्तुत पतसंस्थेने पदार्पण केले ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.

मान्यवरांच्या हस्ते ; पतसंस्थेला सहकार्य करणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे
शाखेचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी शाखेतील
अधिकारी सुजित शेरे, शुभम ढोरे, सुशांत गराडे उपस्थित होते. विलास भेगडे, भाऊसाहेब आगळमे व नारायण असवले यांनी मनोगत व्यक्त केले. बाबाराव अंभोरे,चंद्रसेन बनसोडे,सतीश जाधव या सभासदांनी ठेवी ठेवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संतोष भेगडे यांनी पतसंस्थेत मोठी ठेव ठेवणार असल्याचे जाहीर
केले.

प्रास्ताविक तज्ञ संचालक दिलीप पोटे यांनी केले. सूत्रसंचालन वैजयंती कूल व सुमन जाधव यांनी केले. सीईओ राम कदमबांडे यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
अहवाल वाचन आणि पतसंस्थेचा आर्थिक ताळेबंद खजिनदार भाऊसाहेब खोसे यांनी सदर केला. राम कदमबांडे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!