Puneपिंपरी चिंचवडसामाजिक

पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या बीआरटी मार्गिकेमध्ये बीआरटी बसेसखेरीज इतर वाहनांना प्रवेश बंद. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त.

अधिसूचनेची अमंलबजावणी ०१/ ०९ / २०२३ पासून करण्यात येत आहे.

Spread the love

पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या बीआरटी मार्गिकेमध्ये बीआरटी बसेसखेरीज इतर वाहनांना प्रवेश बंद.काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त. 

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ४ सप्टेंबर.

बीआरटी मार्गिकेमध्ये सध्यस्थितीत  अनेक प्रकारची हलकी व जड अवजड वाहणे प्रवेश करत असुन सदर वाहनांमुळे बीआरटी मध्ये असणारी स्टील रेलिंग, बस स्टॉप अशा प्रकारच्या गोष्टींचे वारंवार नुकसान होवुन रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच सदर वाहनांमुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होवुन जिवीत व वित्त हानी होत आहे.

ज्याअर्थी पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०११६/८७९/सी आर २७ / टी आर ए २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी) ११६ (४) २, दिनांक- आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून  काकासाहेब डोळे, पोलीस उप- आयुक्त, परिर, अति. कार्य, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड शहर, यापूर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असुन खालील प्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत.. पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या बीआरटी मार्गिकेमध्ये बीआरटी बसेसखेरीज (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ. बगळून) इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.तरी वरील प्रमाणे बीआरटी प्रवेश बंदीबाबत अंतिम अधिसूचना (नोटीफिकेशन) काढण्यात नागरीकांनी बीआरटी मार्गिकेचा वापर न करता इतर मार्गिकेचा वापर करावा.

सदर अधिसूचनेची अमंलबजावणी ०१/ ०९ / २०२३ पासून करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!