क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील शिक्षकांसाठी अनोख्या भेटीचे आयोजन..

"यदाकदाचित रिटर्न्स" या संतोष पवार लिखित, दिग्दर्शित नाटकाचा विशेष प्रयोग खास मावळ तालुक्यातील शिक्षकांसाठी..

Spread the love

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील शिक्षकांसाठी अनोख्या भेटीचे आयोजन..A unique meeting was organized for the teachers of Maval taluka on the occasion of Teacher’s Day.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ५ सप्टेंबर.

पिंपरी चिंचवड: यंदाच्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्या माध्यमातून ; आणि भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष अखिल मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या सौजन्याने मावळ तालुक्यात ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना एक अनोखी भेट देण्यात आली आहे.

दणदणीत हास्याचा धो.. धो.. धबधबा असणाऱ्या “यदाकदाचित रिटर्न्स” या संतोष पवार लिखित, दिग्दर्शित नाटकाचा विशेष प्रयोग खास मावळ तालुक्यातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे.
रविवारी, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा विशेष नाट्यप्रयोग सादर होणार असून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी एकत्रितपणे या हास्यमेजवानीचा आस्वाद घ्यायला जरुर यावे, असे आवाहन आयोजक भाऊसाहेब भोईर व मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

सदर नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनाचे अध्यक्षस्थान मावळचे आमदार सुनील शेळके हे भुषवणार असून या कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.. अशी माहिती मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे मुख्य समन्वयक संतोष राणे, अमोल चव्हाण व सुहास धस यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!