आंदोलनमावळ

पोलिसांकडून जालना येथील आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज चा लोणावळ्यात तीव्र निषेध..

लोणावळासह मावळात कडकडीत बंद ..

Spread the love

पोलिसांकडून जालना येथील आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज चा लोणावळ्यात तीव्र निषेध :लोणावळासह मावळात कडकडीत बंद ..Violent protest in Lonavala against police lathicharge on protesters in Jalna: Strict shutdown in Mavala including Lonavala..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ५ सप्टेंबर.

पोलिसांकडून जालना येथील उपोषणकर्ते यांचे जवळ आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज चा मावळासह लोणावळ्यात तीव्र निषेध करण्यात आला. लोणावळा व मावळात मळवली , कार्ला श्रीएकविरा मंदिर , गडपायथा व कार्लाफाटा आणि ग्रामिण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.लोणावळा शहर , ग्रामिणचे पोलिस असे दहा अधिकारी व सुमारे १०० पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लोणावळा उपविभागीय पोलिसआधिकारी कार्यालयाचे आयपीएस पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिसअधिक्षक अंकीत गोयल यांचे आदेशानुसार ठेवला होता.

काल सकाळी ११ ते १ अशी छञपती शिवाजीमहाराज व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास आंदोलनकर्त्यांनी पुष्पहार घालून निषेध सभा घेतली. मोठ्या संख्येने मराठा समाजाचे व सर्वपक्षिय पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या लाठीचार्ज केल्याच्या कृत्याचा तीव्र निषेध करत घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अनेक मान्यवरांनी मराठा आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली व भाषणात मराठा आरक्षण मिळण्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले.काहींनी आरक्षण मिळू नये यासाठी याचिका दाखल केल्या याबाबत अभ्यास करूण मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशा आशयाची भाषणे केली.सकल मराठा समाजाचे समन्वयक संतोष राऊत म्हणाले , छञपतीँच्या प्रमाणे यापुढे गनिमी कावा वापरून मराठा आरक्षण मिळावे यासाठी लढा दिला जाईल, असा इशारा राज्य सरकारला दिला.
आरपीआय चे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के म्हणाले , केरला राज्यात जसे ५१ टक्के आरक्षण आहे , तसे आरक्षण मिळायला पाहिजे.महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सचिव मंजुश्री वाघ म्हणाल्या , मुख्यमंत्री यांनी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करणे असे वेडेचाळे बंद केले पाहिजे.मराठी बांधवांना समोर घ्या बसा त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढा.असे माता , भगीनीँवर लाठीमार करणे तुंम्हाला शोभत नाही.तुमच्याही घरात माता भगिनी आहेत.महिलांवर अन्याय करणे बंद करा. महिला जर रस्त्यावर उतरल्या तर तुमचे राज्यात फिरणे मुश्कील होईल.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे म्हणाले , हा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज कोणी व का केला याची चौकशी झाली पाहिजे.

मराठा समन्वयक विजय तिकोणे , लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष , भरत हारपुडे , काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण गायकवाड , कांँग्रेसचे युवकचे प्रदेश सरचिटणीस अॕड.निखिल कविश्वर , यांनी मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळावे , त्यासाठी कुणी प्रयत्न केले.ते सर्वोच्च न्यायलयात का टिकले नाही, याबाबत भूमिका मांडली. काँग्रेसचे जंगबहादूर बक्षी यांनी संत नामदेव महाराज पंजाबमधे कित्येक वर्षे राहिले. त्यामुळे पंजाबी समाजाचा या आरक्षण व आंदोलनाला पाठिंबा आहे, असे भाषण केले.
यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे म्हणाले , यापूर्वी मराठा आरक्षण मिळावे यासाठी ५२ आंदोलने शांततेच्या मार्गाने झाली.त्यामुळे नावलौकिक वाढला आहे.मराठा आरक्षण केँद्रातील सरकारने कोणतीही ठोस मागणी नसताना एका समाजाला दिले.यावेळी ४८ खासदारांनी पाठिंबा दिला.पण मराठा आरक्षण बाबत कुणी शब्द काढला नाही.दिल्ली दरबारी मराठी आरक्षण बाबत कोणतीच ठोस भूमिका नाही.हे आरक्षण मिळाले पाहिजे.
यावेळी शिवसेना पुरंदरचे संपर्कप्रमुख मच्छिंद्र खराडे म्हणाले, छञपतीँच्या मार्गाने मराठा समाजाने जावे .छञपतीँचा मार्ग स्वराज्याचे दिशेने होता.या सरकारचा तसा हेतू दिसत नाही.सरकारला छञपतींचे मार्गावरून जायचे असेल, तर मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे.

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा.त्याप्रमाणे इथेपण सर्वांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी एकजुटीने एकञ येवून संघर्ष केला पाहिजे.मराठा समन्वयक यांनी एका दिवसात मिटींग घेवून आजच्या या मावळ बंदचे नियोजन केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख गबळूभाऊ ठोंबरे, शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक, भाजपचे माजी नगरसेवक ललीत सिसोदिया, लोणावळा व्यापारी संघटना अध्यक्ष दिलीपशेठ गुप्ता, आदींनी जालना येथील पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध करून मराठा आरक्षण मिळायलाच पाहिजे आशी भूमिका घेणारी भाषणे केली.लोणावळा शहरात भांगरवाडी , गवळीवाडा , वलवण , नांगरगाव ,खंडाळा , गावठाण , सर्वञ कडकडीत बंद पाळण्यात आला.ग्रामिण भागात भैरवनाथनगर , औंढेखुर्द , आदी भागात काही दुकाने अत्यावश्यक सेवा म्हणून उघडी ठेवली होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!