आरोग्य व शिक्षणपिंपरी चिंचवड

आडात नसेल तर, पोहर्‍यात कोठून येणार’..डॉ. दीपक शहा

एकदिवसासाठी प्राचार्या झालेली विद्यार्थीनी प्रांजली इंदलकर हिने केला संस्था चालकाचा सत्कार.

Spread the love

आडात नसेल तर, पोहर्‍यात कोठून येणार’..डॉ. दीपक शहा– एकदिवसासाठी प्राचार्या झालेली विद्यार्थीनी प्रांजली इंदलकर हिने केला संस्था चालकाचा सत्कार.If not in the barrier, where will it come from?..Dr. Deepak Shah- Pranjali Indalkar, a student who became principal for a day, felicitated the institute director.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड  प्रतिनिधी, ६ सप्टेंबर.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी प्राचार्या, प्राध्यापकाची भूमिका वठवून विद्यार्थ्यांना शिकविले. एकदिवसासाठी प्राचार्या झालेली विद्यार्थीनी प्रांजली इंदलकर हिने केला संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांचा विशेष सत्कार विद्यार्थी, प्राध्यापकांच्या वतीने केला.सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संस्था चालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यासमोर नाटीका, गायन, नृत्य सादर करून आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करून आगळा-वेगळा उपक्रम शिक्षक दिनानिमित्त राबविला. मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रोहित आकोलकर यांचाही सत्कार विद्यार्थ्यांनी केला.

संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा मार्गदर्शन करताना, पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आज प्राध्यापकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांना शिकविले त्यांना आज कळाले असेल येथील प्राध्यापकांना तुम्हाला शिकविताना काय त्रास होतो. शिक्षकी पेक्षा जेवढे समजतो तेवढे सोपे नाही, त्याला आवश्यक असणारी अर्हता प्राप्त केली. म्हणजे उत्कृष्ट शिक्षक झालो असे कोणी समजत असेल तर, माझ्या मते चूकीचे होईल. मुळ परीपूर्ण ज्ञान आत्मसात नसेल तर, शिकणारे विद्यार्थी देखील त्याविषयात मागे राहतील, ‘आडात नसेल तर पोहर्‍यात कोठून येणार’ आदर्श शिक्षक होण्यासाठी ते ज्यात यशस्वी झालेेत त्यात सतत अध्ययन ज्ञानाची भर टाकून प्रथम स्वतःला समजून घेत मगच विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषाशैलीत वेगवेगळ्या उदाहरणाची जोड देत आनंदी वातावरणात शिकविले तर, विद्यार्थ्यांमध्ये देखील रूची निर्माण होते व विषय व्यवस्थित समजतो. शिक्षकांच्या योगदानातूनच संस्थेची प्रतिमा उजाळून निघते. पुढे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, सतत अभ्यास, ज्ञानात भर टाकीत जे काही चांगले करू शकाल तेच करा.
मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आपल्या मनोगतात म्हणाले, आपली आई प्रथम शिक्षिका आहे. शाळेतील शिक्षिका दुय्यम आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षीकांची भूमिका महत्वाची असते. शिक्षक त्यांच्या विषयात तज्ञच असला पाहिजे. प्राध्यापकांनी पुस्तक विरहीत विद्यार्थ्यांना अचूक शिकवावे असे आवाहन करीत आज प्राध्यापक झालेल्या विद्यार्थी प्राध्यापकांना 30 ते 40 मिनिटांचा तास घेताना त्याविषयाचा किती तयारी, करावी लागते याची कल्पना आली असेल.

विद्यार्थ्यांना शिकविणार्‍यांनी नेतृत्वगुण संपादन करून शिकविले पाहिजे. मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास केला पाहीजे. विद्यार्थ्यांचे चाळे बंद कसे होतील, याकडे लक्ष केंद्रीत केले पाहीजे.
संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा म्हणाल्या, महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षात मजा, धमाल करा, हे सोनेरी वर्ष आहेत या तीन वर्षात जे करणार आहेत तेच पुढे आयुष्यभर पुरणार आहेत, याची जाणीव ठेवा, असे आवाहन केले.

यावेळी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. रोहित आकोलकर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी अमृता गिरी, प्रा. नव्या दंडवाणी यांनी तर, आभार प्रा. अपराजीता कडवेलकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!