क्रीडा व मनोरंजनमावळ

शिक्षकांच्या गुणगौरवाने शिक्षक दिन साजरा..

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक ५  सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Spread the love

शिक्षकांच्या गुणगौरवाने शिक्षक दिन साजरा..Teacher’s Day is celebrated in honor of teachers. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक ५  सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ सप्टेंबर.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक ५  सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ एम आय डी सी चे नवनिर्वाचित अध्यक्ष रो.राहुल खळदे,सचिव रो.सुनील खोल्लम,माजी अध्यक्षा रो.सुमती निलवे,सर्व रोटरीयन्स यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो; शिक्षकांचा गौरव करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन रो.सुनील खोल्लम यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.
तद्नंतर रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष रो.राहुल खळदे,सचिव रो.सुनील खोल्लम यांनी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका.शमशाद शेख,पर्यवेक्षिका.रेणू शर्मा यांचा सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र, पुष्प देऊन गौरव केला.तसेच रो.सचिन कोळवणकर,रो.सुमती निलवे,रो.ज्योती नवघणे,रो.सुवर्ण मते,रो.संदीप मगर,रो.उमा पवार,रो.संतोष मालपुटे,रो.जगन्नाथ काळे, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव. मिलिंद शेलार सर यांनी सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,पुष्प देऊन सत्कार केला.

रो.सुमती निलवे, रो.ज्योती नवघणे या रोटरी सदस्य असणाऱ्या शिक्षकांचा सत्कार शालेय मुख्याध्यापिका. शमशाद शेख यांनी; श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव.मिलिंद शेलार सर यांचा डॉ.युवराज बढे , रो.संदीप मगर यांचाही शिक्षक दिनानिमत्ताने सत्कार रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सी रो. राहुल खळदे यांनी केला.
सदर कार्यक्रमाला रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष रो.राहुल खळदे,सचिव रो.सुनील खोल्लम,रो.सचिन कोळवणकर, रो.सुमती निलवे,रो.ज्योती नवघणे,रो.सुवर्णा मते,रो.संदीप मगर,रो.उमा पवार,रो.अंतोष मालपुटे जगन्नाथ काळे, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव .मिलिंद शेलार,शालेय मुख्याध्यापिका.शमशाद शेख , पर्यवेक्षिका.रेणू शर्मा,माध्यमिक विभाग प्रमुख सुजाता गुंजाळ,प्राथमिक विभाग प्रमुख.धनश्री पाटील,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख. सरोदे तेजस्विनी,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, इ.दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मानसिकता विचारात घेऊन प्रभावी शिक्षण द्यावे असे मनोगत रो.संदीप मगर यांनी व्यक्त केले.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे हाडाचे शिक्षक होते,त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास करावा असे रो.सुमती निलवे यांनी वक्तव्य केले.
शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कृत करताना या कौतुक सोहळ्याचा अभिमान वाटतो;विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, विकासात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो असे मनोगत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रो. राहुल खळदे यांनी व्यक्त केले.
इ. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच शिक्षकांच्या भूमिका साकारून शिक्षक होण्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन, चिकाटीने अभ्यास करावा, उत्तम गुण संपादन करून स्वतःचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मार्गदर्शन शालेय मुख्याध्यापिका.शमशाद शेख यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका .शमशाद शेख, पर्यवेक्षिका.रेणू शर्मा,इ.दहावीचे विद्यार्थी,सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.सूत्रसंचालन शालेय शिक्षिका.साक्षी पवार आणि आभार प्रदर्शन.मिलिंद शेलार सर यांनी केले.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष.संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा.रजनीगंधा खांडगे, मिलिंद शेलार सर, कार्याध्यक्ष.बाळासाहेब शिंदे आदींनी भावी सुजाण नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!