क्रीडा व मनोरंजनमावळ

लोणावळा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचे थरावर थर , तरूणांचा अमाप ऊत्साह.

लोणावळा दहीहंडी महोत्सवाच्या मानाच्या पहिल्या दहीहंडीसाठी मुंबई , व मावळातील गोविंदा हजर, राष्ट्रवादी च्या दहीहंडीसाठी आमदारांसह सेलिब्रिटी अभिनेञी यांची हजेरी.

Spread the love

लोणावळा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचे थरावर थर , तरूणांचा अमाप ऊत्साह,लोणावळा दहीहंडी महोत्सवाच्या मानाच्या पहिल्या दहीहंडीसाठी मुंबई , व मावळातील गोविंदा हजर.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा प्रतिनिधी, ८ सप्टेंबर.

लोणावळा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचे थरावर थर लावत आधी सलामी देवून व नंतर लाॕट पाडल्यावर दहीहंडी फोडून गोविंदांनी गोकुळाष्ठ्टमीच्या उत्साह गाजवला.गावोगावी मंदिरांमधून दहीहंडीसाठी आबालवृध्द , महिलांची गर्दी पहायला मिळाली. वाघोबा, जाखमाता,श्रीभैरवनाथ, श्रीकान्होबा, श्री काळभैरवनाथ आदींच्या भक्तगणांनी दहीहंडी फोडून आनंद साजरा केला.

भक्तांची दहीहंडी पाहण्यासाठी कुसगाव बुद्रूक , औढे , औढोली , देवले, पाटणा, भाजे येथे गर्दी दिसून आली.सकाळपासून शहरातील श्रीकान्होबा अस्थाना, गोपाळ सहकारी सोसायटी, येथे भक्तांची मांदियाळी भरली होती. तसेच श्री भैरवनाथ मंदिराचे प्रांगणात भक्तांची गर्दी झाली होती.

लोणावळा दहीहंडी महोत्सवाच्या मानाच्या पहिल्या दहीहंडीसाठी मुंबई , व मावळातील गोविंदा हजर होते. राष्ट्रवादीचे दहीहंडीसाठी मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांचेसह प्रसिध्द अभिनेञी यांनी हजेरी लावल्याने दहीहंडीसाठी रंगत वाढत होती. मनसेतर्फे भाजीमंडईतील चौकात बांधलेल्या दहीहंडीसाठी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराध्यक्ष भारत चिकणे ,  कडू , अक्षय जाचक , भोसले हजर होते.

मानाच्या पहिल्या मावळ वार्ता फौडेशन च्यावतीने व श्रीस्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सतर्फे तसेच लोणावळा शहर पञकार संघ व सत्यनारायण चॕरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडी ची ७लाख ७७ हजार ७७७/-रक्कम जिँकण्यासाठी चढाओढ होती.तशीच चढाओढ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ९,९९,९९९/-या सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी स्पर्धा पहायला मिळाली. येथे लोणावळा उपअधिक्षक कार्यालयाचे आयपीएस पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या अनुभवाबाबत त्यांनी वडिलांना बरोबर आणल्याने प्रबोधन करत होते. यावेळी व्यसन मुक्तीचे पथनाट्य झाले.

श्री.कार्तिक पुढे माहिती देताना म्हणाले , ” तरूणांनो व्यसनापासून दूर राहा , तसेच या वेळी शपथ देण्यात आली की , यापुढे कोणतेही अमलीपदार्थ व तंबाखू जन्य पदार्थाचे व्यसन करणार नाही , जुगार खेळणार नाही , मटका खेळणार नाही व मद्य प्राशन करणार नाही ,..सूञसंचालन मावळ वार्ता फौडेशन चे संचालक बाप्पूलाल तारे यांनी केले.यावेळी मावळवार्ता फौडेशन चे अध्यक्ष बाबुजी तथा नंदकुमार वाळंज , दहीहंडी उत्सव अध्यक्ष हेमंत मुळे , संचालक संजय अडसुळे , श्री. वर्तक , आशिश बुटाला ,जितुभाई टेलर , सचिन पारख , जितेंद्र बोञे , आदी मान्यवर उपस्थित होते.
जयचंद चौकामधे राष्ट्रवादी युवकचे दहीहंडीसाठी येथे  अभिनेञींनी सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावली.

येथे भैरव गर्जना ढोलताशा पथकाने सलामी देत ध्वज उंचावत चांगला खेळ प्रदर्शित केला. येथील खेळाला आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी दाद देत सुमारे दहा हजाराचे बक्षिस दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस मंजुश्री वाघ यांनी आकरा हजाराचे बक्षीस दिले. यावेळी शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , धनंजय काळोखे , गणेश चव्हाण , रवि पोटफोडे , आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदारांचे हस्ते येथे पुलाव भात वाटप केल्याबद्दल श्रीसत्यनारायण चॕरिटेबल ट्रस्टचे नितीनशेठ आगरवाल व त्यांचे सुपुञ यांचा सत्कार केला.तसेच ढोलताशा पथकातील खेळाडू यांचा आणि येथील मुख्य संयोजक विनोद होगले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी काळाचौकी , चेंबूर येथील गोविंदा पथकांनी चांगली सात थर लावून सलामी दिल्याप्रित्यर्थ त्यांना बक्षीसे देण्यात आली. सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना वलवण , नांगरगाव , इंदिरानगर , ठोंबरेवाडी , खंडाळा , समतानगर वलवण ,भांगरवाडी ,तुंगार्ली येथील मंडळांना तीन्ही दहीहंडी आयोजक यांचेकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.

मनसेतर्फे आयोजित दहीहंडीसाठी राञी आठ नंतर सहा सात पथकांचे लाॕट सलामीसाठी पाडले होते. नंतर तेथे दहीहंडीसाठी आलेल्या प्रत्येक संघाला सःधी दिली गेली…
मनसेतर्फे आयोजित दहीहंडीसाठी ही सर्वात लहान गोविंदासाठी सेप्टी बेल्ट (दोर) देण्यात येत होता..
ढोलताशांचा दणदणाट , बाॕडीबिल्डर तरूणांचे बाॕडीशो , जेष्ठ नागरिकांचा व मावळवार्ता फौडेशन चे सर्व सदस्य यांचा डान्स , भैरवगर्जना ढोल ताशा , ध्वजपथकाचा दणदणाटात खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!