मावळसामाजिक

लोणावळा सहकारी बँकेची २५ वी रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा संपन्न..

तेरा टक्के लाभांश वाटपाचा निर्णय सभेत जाहीर ..

Spread the love

लोणावळा सहकारी बँकेची २५ वी रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा संपन्न ; तेरा टक्के लाभांश वाटपाचा निर्णय सभेत जाहीर ..25th Silver Jubilee General Meeting of Lonavla Cooperative Bank concluded; Thirteen percent dividend distribution decision announced in the meeting..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ९ सप्टेंबर.

लोणावळा सहकारी बँकेची २५ वी रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी १३ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गेली अनेक वर्षे लोणावळा सहकारी बँक , लोणावळा बझार येथे कार्यरत असलेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आजित आनंत घमंडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सर्व संचालक मंडळातर्फे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेतर्फे पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.सभेच्या प्रारंभी बँकेचे उपाध्यक्ष अॕड.संजीव खळदकर यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी विठ्ठल दळवे यांनी सूञसंचालन व सर्वांचे स्वागत केले. यावेळी दीपप्रज्वलनाने व श्रीच्या मुर्तींची पुष्पहार घालून पूजा करून सभा सुरू झाली.

यावेळी २०२२-२३ मधे बँकेतर्फे ३ कोटी १४ लाख ५० हजार ८५४.७१ इतका आर्थिक वर्षामधे नफा झाल्याचे जाहीर करण्यात आले. गतवर्षी तो २८६.३६ लाख होता.
बँकेचे ६३७० सभासद असून गतवर्षी पेक्षा २२९ने वाढ झाली आहे.बँकेचे वसूल भागभांडवल ६३३.७६लाख असून गतवर्षी ६१६.१४ लाख होते.बँकेच्या ठेवी ३२९३३.९७ लाख असून कर्जवाटप २१९८७ .११ आहे.गतवर्षी १५०९७.७१ होते.
बँकेने पाच लाखापर्यंत ठेवी आसलेल्या सर्व ठेवीदारांना १००% विमसंरक्षण दिले आहे. कर्जवाटपात ४५.६३ % वाढ झाली आहे. दुचाकी , चारचाकी व सोनेतारण कर्जाची सुविधा माफक व्याजदर लावून दिली आसल्याचे आहवालात नमूद केले आहे.एकूण आर्थिक वर्षात ५५४.४७ लाख इतकी थकबाकी ४१७ खातेदारांकडे आहे. हे एकूण कर्जाशी २.५२%प्रमाण आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानावरून मुकूंद मफतलाल शहा यांनी बँकेच्या नफातोटापञकाचा व ताळेबंद यांचा आढावा घेतला तसेच सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी नफातोटा पञकाचे व सन २०२२-२३ च्या ताळेबंद चे तसेच आंदाजपञकाचे वाचन मुख्यकार्यकारी अधिकारी आजित घमंडे यांनी केले. सुमारे ३ कोटी १४ लाख पन्नास हजार ८५४नफा वाटप करण्यात आला आसून रौप्य महोत्सवी निधीसाठी ३५ लाख वर्ग करण्यात आला.तर ७७लाख ३९हजार ५९६ रूपये नफा १३%लाभांश म्हणून सभासदांना खात्यात वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले . एसटी रिझर्व्ह फंड साठी ७८ लाख ६२ हजार व रिझर्व्ह फंड म्हणून ३१लाख ४५हजार वर्ग करण्यात आला आहे.

श्री.अजित घमंडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संचालक मंडळ , सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेकडून पुणेरी पगडी घालून व शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून संस्थापक अध्यक्ष मुकूंदशेठ शहा व उपाध्यक्ष अॕड.संजीव खळदकर व संचालक यांचेकडून सत्कार करण्यात आला यांच्या सासूबाई यांनी आपल्या जावयाने अत्यंत कष्टाने बँकेची नोकरी करत उच्च पदावर आसताना ते सेवानिवृत्त होत आसल्याचा सर्वांना अभिमान वाटतो , असे भाषणात सांगून जावईबुवांचे मनापासून कौतुक केले.मुलीला सुखात ठेवले, नातवंडे यांना चांगले शिक्षण दिलेअसे सांगितले.

भरत तथा साहेबराव टकले यांनी आभार मानताना मुख्यकार्यकारी अधिकारी अजित घमंडे यांचेबद्दल गौरवोद्गार काढले.कर्जदार कितीही रागात आला वा कर्ज थकबाकीदार आला; तर त्याला घमंडे साहेब योग्य व शांततेत मार्गदर्शन करीत कर्ज वसूल केले जाई. त्यांच्या सासूबाई यांनी त्यांचे जावयाबद्दल काढलेले गौरवोद्गार त्यांचे प्रेमळ स्वभावाची व कार्यकर्तृत्वाची ग्वाही देतात, त्यामुळे जास्त बोलणे उचित नाही.घमंडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले , की मी बँकेचे संस्थापक मुकूंद शेठ यांचे सहवासात आल्यानंतर त्यांनी लोणावळा बझारचे व्यवस्थापक म्हणून तसेच पुढे बँकेचे व्यवस्थापक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ही जबाबदारी सोपविल्यामुळे मी नोकरी म्हणून काम केले नाही ,सामाजिक कार्य म्हणून काम केले, त्यामुळे समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. घरी बाजारहाट, भाजी खरेदीला न जाणारा मी लोणावळा बझारसाठी ट्रकने मालाची खरेदी करायला जावू लागलो.पत्नी व दोन मुले यांना म्हणावा तितका वेळ देता आला नाही, आई , वडील, सासू सासरे यांचेकडून मला सतत प्रेरणा व मार्गदर्शन आणि आपुलकीने वागणूक मिळाली ,त्यांचे ऋणामधे राहणे मी पसंत करतो, असे भावनिक उद्गार काढत असताना , कंठ दाटून आल्याने घमंडे थोडे निशब्द झाले. त्यांनी आपण आरएसएसचे कार्यही समाजासाठी करीत आलो आहोत, असे भाषणात सांगितले.

यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी विठ्ठल दा. दळवे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी पदावर् सेवानिवृत्त झाले असले तरी ,  घमंडे हे यापुढेही संचालक म्हणून बँकेच्या कामकाजात मार्गदर्शन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष मुकूंदशेठ शहा यांचेकडून जाहीर करीत असल्याचे सांगितले. तसेच दळवे यांनी सूञसंचालन केले. यावेळी संचालक व माजी उपाध्यक्ष सुनिल गायकवाड, संचालक अभयकुमार पारख, कन्हैया भुरट, सुधाकर भागवत, अॕड.भरत तथा साहेबराव टकले, उदय सरवदे, आशिश शहा, महेंद्र ओसवाल,प्रतिमा वि.बलसारा, सेजल क.शहा आप्पा जत्ती, निखिल शहा, प्रमोद अच्युत, लोणावळा मुख्यशाखा अधिकारी कुंदन धरी, सहाय्यक व्यवस्थापक लोणावळा शाखा कु.श्वेता कनगुटकर , शाखा अधिकारी अजय लोणकर, कल्याण काळे, श्रीकांत धावडे, संदेश करमाळकर, संजय जाधवर व सदानंद पेंडसे आणि सर्व सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!