क्रीडा व मनोरंजनमावळ

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे-  ७ सप्टेंबर रोजी शिक्षक कृतज्ञता सोहळा संपन्न.

विद्यार्थी पालकमंत्री डॉक्टर शाळीग्राम भंडारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..

Spread the love

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे-  ७ सप्टेंबर रोजी शिक्षक कृतज्ञता सोहळा संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ९ सप्टेंबर.

भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलाने या समारंभाची सुरुवात झाली, सर्वप्रथम विद्यार्थ्यांतर्फे कु विशाखा कदम- चि मुकुंद चव्हाण आणि समृद्धी यांनी- आईच्या मायेने शिकवणाऱ्या आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.प्राचार्य मोनालिसा पारगे आणि उपप्राचार्य क्रिस्टीना रणभिसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की- विद्यार्थी स्वतः क्वीन आणि किंग आहेत.

आम्ही फक्त किंगमेकर आहोत याचा आंम्हाला सार्थ अभिमान आहे, प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी संस्थेत नर्सिंगकोर्ससाठी प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचं– सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन आणि स्वागत केल,  जर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून हा व्यवसाय जर आपण स्वीकारला तर- प्रत्यक्ष परमपिता परमेश्वराचच कार्य केल्याचं समाधान आपण अनुभवणार आहोत. एवढेच नव्हे तर रुग्णसेवेत शंभर टक्के यशस्वीतेचे आपण मानकरी ठरणार आहोत. हे गेल्या पन्नास वर्षाच्या आपल्या अविरत रुग्ण सेवेतील विविध उदाहरण देऊन डॉक्टरांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

अत्यंत संवेदनशील शब्दात गुरुजनांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि कु श्रुती कदम आणि दिव्या केदारीनी अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचलन करून कार्यक्रमाची उंची वाढवल्याबद्दल त्यांचा डॉक्टर शाळीग्राम भंडारी लिखित पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

व्यवस्थापिका संगीता मॅडम यांनी शुभेच्छा दिल्यानंतर सीईओ मिसेस डॉक्टर गार्गी मेहता यांनी- नावीन्यपूर्ण अशा समारंभाचा संस्थेतर्फे समारोप केला. साऊंड सिस्टिम आणि समारंभाचे  नियोजन करण्यास विशेष परिश्रम प्रफुल्ल लोंढे आणि त्याच्या टीमने घेतले श्रुती चव्हाण या विद्यार्थिनीने प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारी आणि उपस्थिताचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!