Puneनिधनवार्तामहाराष्ट्र

कोपर्डी  बलात्कारातील कैदी, जितेंद्र शिंदेची येरवडा जेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या..

तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते.

Spread the love
कोपर्डी  बलात्कारातील कैदी, जितेंद्र शिंदेची येरवडा जेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या Kopardi rape prisoner Jitendra Shinde commits suicide by hanging himself in Yerawada Jail
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १० सप्टेंबर.
अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा जेल मधील कैदी व कोपर्डी येथील बलत्कारातील कैदी व खुनाचा मुख्य आरोपी तसेच फाशीची शिक्षा झालेला जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याने आज येरवडा जेलच्या बराकी मध्ये पहाटेच्या सुमारास टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी पहाटेच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अहमदनगर कोपर्डी येथे २०१६ मध्ये सामुहिक अत्याचार व खून केल्या प्रकरणी न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलूमे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, १३ जुलै २०१६ च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील जितेंद्र शिंदेसह तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यासाठी एका विशेष फास्ट – ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.
आत्महत्याची माहिती मिळताच येरवडा जेलचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!