अध्यात्मिकमावळ

तुमची श्रध्दाच तुम्हाला गुरूवर प्रेम करण्यासाठी प्रेरीत करते; प पू मूनीप्रवर पीयूषचंद्र विजयजी महाराज..

Spread the love

तुमची श्रध्दाच तुम्हाला गुरूवर प्रेम करण्यासाठी प्रेरीत करते;प पू मूनीप्रवर पीयूषचंद्र विजयजी महाराज.It is your faith that prompts you to love the Guru.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १० सप्टेंबर.

तुमची श्रध्दाच तुम्हाला गुरूवर प्रेम करण्यासाठी प्रेरीत करते असे उद्गार गुरू पीयुषचन्द्र विजयजी महाराज यांनी चातुर्मास निमित्त सुरू असलेल्या व्याख्यानात काढले.आपली काळजी आपण करायची नाही ती आपले गुरू करत असतात.अडचणीत समोर येऊन जे उभे राहतात ते फक्त गुरूच असतात.गुरू पैशा पेक्षा श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला आशीर्वाद देतात.रोज रोज गुरूला तुमची दुःख सांगू नका, संकट समयी गुरूच तुंम्हाला बाहेर काढतो.

आई वडिलांना मुला प्रती कधीच घृणा निर्माण होत नाही,आई वडील मुलांना कधीच शाप देत नाही.गुरू कधी कोणत्या रुपात आपल्या जवळ येऊन जातात हे आपल्याला पण कळत नाही.दान करताना असे करा की शेजाऱ्याला पण कळणार नाही, हेच गुरूला अपेक्षित असते.
सिद्धिदायक सिद्धितप नंतर तपोधरा धार्मिक नगरी तळेगांव दाभाडे शहरात “गणधर गौतम लब्धितप” बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 पासून मोठ्या उस्ताहात सुरू झाला आहे.
22 दिवसाच्या या तपस्ये मध्ये 11 दिवस उपवास व 11 दिवस बियाशने आहेत.

तळेगाव दाभाडे येथील जिरावाला जैन मंदिरामध्ये परोपकारी सम्राट आचार्य श्री ऋषभचंद्र सुरिश्वरजी महाराज साहेबांचे यांचे अज्ञानु वरती शिष्य पंचम वर्षीतप तपस्वी वरिष्ठ मुनीप्रवर श्री पियुषचंद्र विजयजी महाराज साहेब, मुनिप्रवर श्री रजतचंद्र विजयजी महाराज साहेब,मुनी श्री प्रितियशचंद्र विजयजी महाराज साहेब यांचा परमपथ चातुर्मास 2023 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

तळेगाव शहरातील श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त याचे नियोजन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!