क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवडसामाजिक

अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास’..

या दहीहंडी महोत्सवाची सुरवात चिंचवडगावातीलच ‘श्री वरदहस्त’ पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली.

Spread the love

अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास’.

या दहीहंडी महोत्सवाची सुरवात चिंचवडगावातीलच ‘श्री वरदहस्त’ पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १० सप्टेंबर.

पिंपरी चिंचवड शहरातील मानाची पारंपरिक दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित ‘अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास’ मिळाला.

पिंपरी चिंचवड मधील ताथवडे गावातील ‘नृसिंह’ गोविंदा पथक, मुंबई चेंबूर मधील ‘शितळादेवी’ गोविंदा पथक, मुंबई गोवंडी येथिल ‘लुंबिनीबाग’ गोविंदा पथक, चेंबूर सिद्धार्थनगर येथिल गोविंदा पथकाने चित्तथरारक कसरंतीचे प्रदर्शन व स्पर्धा करीत सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली.
शेवटी चेंबूरच्या ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाने दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला.

दहिहंडी महोत्सवाचे संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने स्मृतीचिन्ह व 5,55,555 रुपयांचे बक्षीस आमदार उमाताई खापरे व यांच्या हस्ते गोविंदा पथकास देण्यात आले.

दरम्यान या दहिहंडी महोत्सवास आवर्जून उपस्थित असलेले चिंचवडचे सुपुत्र व ‘शेर शिवराज आणि सुभेदार’ या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते प्रद्योत पेंढारकर, मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप, भाजपा प्रदेश सचिव व शहर प्रभारी वर्षाताई डहाळे, भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, माजी विरोधी पक्षनेते नानासाहेब काटे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, चंद्रकांतआण्णा नखाते, नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापूसाहेब काटे, नामदेवजी ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, संदिपआण्णा कस्पटे, हर्षल ढोरे, राज तापकीर यांचा यावेळी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आले.

यावेळी टाटा मोटर्स युनियन चे माजी अध्यक्ष शिवाजीराव शेडगे, समितीचे मार्गदर्शक दत्ताभाऊ चिंचवडे, भारत केसरी पै.विजय गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे मा.अध्यक्ष अंबर चिंचवडे, भाजपा शहर उपाध्यक्ष पाटीलबुवा चिंचवडे, शेखर चिंचवडे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, भाजपा जेष्ठ नेते रविंद्र देशपांडे, कामगार नेते हरीभाऊ चिंचवडे, भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, चिंचवडचा राजा संत ज्ञानेश्वर मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ सायकर, नव तरुण मंडळाचे अध्यक्ष चेतन चिंचवडे, जयहिंद सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष राहुल भोईर, संचालक बाळासाहेब लोंढे, सामाजिक कार्यकर्ते सोपानअण्णा चिंचवडे, दिपकआण्णा गावडे, धनंजय वीपट, माऊली गावडे, काळभैरवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश लांडगे, प्रसिद्ध बांधकाम व्यायसायिक दिलीपशेठ सोनिगरा, बंडूशेठ खुळे, विलासशेठ भोईर, किरण ठाकूर, तेजस इंगवले, सुरेश पाटील, वर्मा ज्वेलर्सचे निलेश वर्मा, तुषार दाभाडे, मोरया ग्रीनचे सचिन गावडे, मयूर जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर यांनी केले. तसेच दहिहंडी महोत्सव यशस्वी व्हावा याकरिता स्वप्निल शेडगे, अजित कुलथे, धनंजय शाळिग्राम, राघूशेठ चिंचवडे, नंदूकाका भोगले, राजन पाटील, स्वप्निल देव, राजन चिंचवडे, अतुल कांबळे, अश्विन चिंचवडे, विशाल भदे, विजय शेट्टी, अक्षय तिकोणे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!