महाराष्ट्रमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे एसटी आगारातुन दर शनिवार, रविवारी किल्ले रायगड करीता एसटी बस सेवा होत आहे सुरु.. ..

३० सप्टेंबर पासून होणार बससेवा सुरू..

Spread the love

तळेगाव दाभाडे एसटी आगारातुन दर शनिवार, रविवारी किल्ले रायगड करीता एसटी बस सेवा ३० सप्टेंबर पासून होणार बससेवा सुरू.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ सप्टेंबर.

मावळ तालूक्यातील सर्व शिवभक्तांना कळविण्यात आनंद होत आहे की, आपल्या मावळ तालूक्यातून आता किल्ले रायगड करीता एसटी बस सेवा गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगाव मावळ व सर्व शिवभक्त यांचे प्रयत्नातून दि.३०/०९/२०२३ रोजी पासून चालू होत आहे.

मावळ तालूक्यातून किल्ले रायगड करीता थेट एसटी बस सेवा नसल्याने शिवभक्तांना परिवारासह किल्ले रायगडावर जाण्याकरीता अडचण येत होती.आता तळेगाव दाभाडे एसटी आगारातुन दर शनिवार रविवारी किल्ले रायगड करीता एसटी बस सेवा चालू होत आहे.

आता तळेगाव दाभाडे एसटी आगारातुन दर शनिवार रविवारी किल्ले रायगड करीता एसटी बस सेवा चालू होत आहे.वेळ – तळेगाव दाभाडे येथून सकाळी ०६:०० वा.व किल्ले रायगड येथून परतीचा प्रवास संध्यकाळी ०५:०० वा.बुकिंग ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध असणार आहे.तसेच चिंचवड़ – तळेगाव दाभाडे- लोणावळा – खोपोली – पाली – महाड – किल्ले रायगड. हे बसस्थानक असणार आहे.

 

रायगड बस मुळे पर्यटनाला चालना व नागरिकांना पुढीलप्रमाणे फायदे मिळणार आहेत..

१ लोणावळा करीता पर्यायी सोय,
२ अष्टविनायक पैकी आठवा गणपती श्री बल्लाळेश्वर दर्शन,
३ पाली जवळील सरसगड व सुधागड एक – एक दिवसात दर्शन.
४ उन्हेरे गरम पाण्याचे कुंड
५ मार्गातील स्थानिक ग्रामस्थ यांना फायदेशीर

तरी सदर एसटी बस सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी एसटी महामंडळाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!